धाराशिव/तेरणेचा छावा:- :- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या दृष्टीने भाजपा अनु.जातीची महत्वपूर्ण बैठक शहरातील प्रतिष्ठान भवन येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत बोलताना माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना सोबत घेऊन सर्व योजनेचा लाभ दिला त्याचप्रमाणे आपकी बार चारसो पार झालेच पाहिजे यासाठी आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना खासदार करण्यासाठी तन-मन धनाने व प्रामाणिक प्रयत्न करून त्यांना निवडून द्यायचे आहे.
भाजपाचे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अमोल पेठे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी पंडित सुर्यवंशी, दिपक चाबुकस्वार, विनोद जाधव,सागर पारडे, संग्राम बनसोडे, मेसा जानराव, पुष्पकांत माळाळे, राजेंद्र गायकवाड, सचिन लोंढे यांच्यासह अनुसूचित जाती जमातीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments