धाराशिव/तेरणेचा छावा:-
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार फायनल करून माझ्याकडे नाव सुचवावे असे जाहीर केल्यानंतर सकल मराठा धाराशिव हेही एक उमेदवार देणार असून यासाठी शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
याविषयी सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मोठी चळवळ निर्माण झालेली आहे कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वात पहिला मूकमोर्चा धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण पेटल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला जिल्हास्तरीय मोर्चा छत्रपती संभाजीनगर व दुसरा मोर्चा धाराशिव येथे काढण्यात आला होता. धाराशिव मध्ये आरक्षणासाठी मोठी जनजागृती झालेली आहे यातच मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या नऊ महिन्यापासून चालू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी धाराशिव लोकसभा क्षेत्रातून मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाज महाबैठकीत प्रत्येक जिल्ह्यात एकच उमेदवार देण्यात येणार असल्याचे समाजाच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातही एकच उमेदवार देण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाची बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी व समाज बांधवांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments