संग्रहित
धाराशिव/ तेरणेचा छावा:-
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील आठ महिन्यापासून चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सर्वच राजकीय पक्षांची राजकीय गणित बिघडलेली आहेत. मनोज सारंगे पाटील यांच्या आंदोलना मुळे बऱ्याच प्रमाणात यश आले आहे परंतु शासनाने सग्य सोयऱ्याचा जीआर काढला परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विधिमंडळात कायदा बनलेला नाही, तो कायदा संमत करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या देहाचा त्याग ही करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असे सरकारला ठणकावून सांगून सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच हे वारंवार सूचित केले आहे. मागील काही दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात फूट पडावी म्हणून काहींनी वेगवेगळी स्टेटमेंट केली होती परंतु मराठा समाजांनी त्यांच्या स्टेटमेंट कडे दुर्लक्ष करत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठाम उभा राहण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलनावर मार्ग कसा काढायचा याच्या चक्रव्यूहात सरकार अडकले आहे. सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची वेगळी तरतूद केलेली आहे परंतु या आरक्षणावर ही मराठा समाज खुश नसल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे यातच सरकारने आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेले नाहीत, सग्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावण्यासाठी कायदा करण्यासाठी चालढकल केली जात आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी ची चौकशी नेमली आहे. यामुळे तर मराठा समाजात सरकार विषयी रोष तर आहेत परंतु विरोधकाविषयी सुद्धा कमालीचा असंतोष असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला रोष दाखवेल यात शंकाच नाही परंतु प्रत्येक लोकसभेच्या क्षेत्रात प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार उभे करून निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे यातून निवडणूक आयोग कोणता निर्णय घेते हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार उभे करण्याच्या मराठा समाजाच्या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांची गणिते बिघडल्याचे दिसून येत आहे. याविषयी मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता हा सर्वस्वी समाजाचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी समाजाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे या गोष्टीकडे कसा मार्ग काढायचा हा राजकीय पक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे कारण प्रत्येक गावातून उमेदवार उभे राहिल्यास राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मतावर त्यांचा नक्कीच परिणाम होणार आहे. या गोष्टीमुळे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धसका घेतलेला असल्याने राजकीय मंडळी आपल्या कार्यकर्त्यामार्फत वेगवेगळे सल्ले मराठा समाजाला देताना दिसून येत आहेत परंतु मराठा समाज या कार्यकर्त्यांना उत्तरे देत पुरून उरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेत्यांचा व कार्यकर्त्यांचाही नाईलाज होत आहे. अशाप्रकारे नुसते फॉर्म भरायचे म्हटले तर एवढी पोटदुखी पुढे तर कसे होणार हा प्रश्न त्यांना सतावत आहे. लोकसभा क्षेत्रातील अनेक गावांनी तर राजकीय नेत्यांना गावबंदी तर केली आहेत तसेच आपापल्या घरावर राजकीय पक्षांनी माझ्या दारात यायचं नाही असेही बॅनर घराच्या दरवाजाला चिटकवलेले आहे शिवाय गावातील एकही व्यक्ती राजकीय नेत्याबरोबर फिरणार नाही असाही काही ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांचे उमेदवार नेमका यातून कसा मार्ग काढतात हे येणाऱ्या काळात पहावयास मिळणार असले तरीही अनेक राजकीय पक्षांनी धसका घेतलेला आहे हे मात्र खरेच असल्याचे दिसून येत आहे!
0 Comments