Subscribe Us

धाराशिव येथे खेळ पैठणीचा कार्यक्रमास दांडगा प्रतिसादः स्कुटी, 301 पैठणी साड्या, 31 मिक्सर, फ्रीज, स्मार्ट टिव्हीसह वॉशिंग मशीनचे वितरण


शिवसेना नेते सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव/तेरणेचा छावा:- राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम सोमवारी दि.11 सायंकाळी शानदार सोहळ्यात पार पडला. या कार्यक्रमाचे शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर, अभिनेत्री सोनाली पाटील, भारगवी चिरमुले व सुरबी हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. धाराशिव शहरासह परिसरातील महिलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून मनसोक्त आणि मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे हा देखणा कार्यक्रम आयोजित करून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. सावंत यांचे महिलांनी तोंडभरून कौतूक केले. यापुढेही महिलांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सांवत यांनी दिली. प्रथम विजेत्या महिलेस एक स्कुटी, इतर महिलांना 301 पैठणी साड्या, 31 मिक्सर, डबलडोर फ्रीज, स्मार्ट टिव्हीसह, वॉशिंग मशीनचे वितरणही श्री. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस 15 मार्च रोजी आहे. महिला कुटुंबाचा कणा आहे. आपला संसार संभाळताना त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरात यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे  शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.
धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी होम मिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले तर अभिनेत्री सोनाली पाटील, भारगवी चिरमुले व सुरबी हांडे यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास स्कुटी, दुसऱ्या क्रमांकास फ्रीज, तिसऱ्या क्रमांकास स्मार्ट टीव्ही, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशिन तर लकी ड्रॉमधील विजेत्यांना 301 पैठणीसह प्रेशर कुकर भेट देण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांनी विविध गिते सादर करून महिलांना ठेका धरण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे 60 वर्षावरील वयोवृध्द महिलांनीही सहभाग नोंदवून व्यासपीठावर विविध गितांवर चांगला ताल धरला. या कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उपस्थित लावल्याने अवघे लेडीज क्लबचे मैदान खचाखच भरल्याचे दिसून आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, मागासवर्गीय शिवसेना जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप, कळंब तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, कळंबचे माजी नगराध्यक्ष सागर मुंडे, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, शहर संघटक रणजीत चौधरी, उपशहर प्रमुख रजनीकांत मळाळे, शहरप्रमुख सागर कदम, भीमा जाधव, पप्पू मुंडे, प्रवीण पवार, शशांक सस्ते, अमर माळी, सादिक तांबोळी, रॉबिन बगाडे, जावेद शेख, अभिजीत देडे, उपसरपंच रवी गिरी, सरपंच गोविंद आव्हाड, उपसरपंच शशांक सस्ते, बालाजी मळगे, दत्ता तिवारी, गुणवंत देशमुख, आनंद भकते, विशाल हिंगमिरे, सरपंच नवनाथ सूर्यवंशी, उत्तम कीर्तने, आशिष खोबरे, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, रामेश्वर घोगरे, नितीन घोरपडे, दिलीप सावंत, दिनेश पवार, रवी देवकते, खंडू ठवरे, अक्षय शेंडगे, शुभम पांढरे, बबलू नवले, योगेश तुपे, अक्षय माळी, गणेश जाधव, योगेश तुपे, अमर मडके, आतिश माने, अजिंक्य आगलावे, सौरभ निंबाळकर, दिनेश तुपे, ओम जाधव आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments