Subscribe Us

15 मार्च रोजी धाराशिव साखर 2023-24 वर्षीचा गळीत हंगाम होणार बंद


धाराशिव/तेरणेचा छावा:-
डि.व्ही.पी.उद्योग समुह धाराशिव साखर कारखाना लि, चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद / बिगर सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम दि. १५/०३/२०२४ चे दरम्यान बंद होणार आहे. तरी ज्या ऊस उत्पादकांचा या हंगामासाठी कारखान्याकडे नोंद व बिगर नोंद, न्यायप्रविष्ट, आपसातील तक्रारीमुळे, रस्त्या अभावी, नापीक ऊस अद्याप तोडणी अभावी ऊभा आहे, अशा सर्वांनी दि. १३/०३/२०२४ रोजी पर्यंत कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधुन आपण स्वतः ऊस तोड व वहातुक करुण गाळपास पाठवण्याची व्यवस्था करावी.
सदर नोंद / बिगर नोंद ऊस गाळपा अभावी शिल्लक राहिल्यास त्यास कारखाना जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व ऊस उत्पादकांनी नोंद घ्यावी  अशा प्रकारचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर
कार्यकारी संचालक  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments