Subscribe Us

मलकापूर दहिफळ मोहा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू!!


ग्रामपंचायत कार्यालयाची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार
धाराशिव /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मलकापूर दहिफळ मोहा या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असून त्या कामासाठी कोट्यावधी रुपयाचे बजेट असतानाही ते काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची तक्रार दहिफळ ग्रामपंचायत कार्यालयाने अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना धाराशिव या कार्यालयाकडे दिली आहे.
     मलकापूर दहिफळ मोहा या रस्त्यावर मलकापूर ते सापनाई या रस्त्याचे काम गेल्याच वर्षी करण्यात आले होते परंतु निकृष्ट कामामुळे तो रस्ता बऱ्याच ठिकाणी उखडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता परत त्या रस्त्यावर काम होणार असून त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर होणारच आहे परंतु नवीन होणारे काम तरी शासकीय नियमाने होणार आहे का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. काम करणारी यंत्रणा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचेही लोकातून बोलले जात आहे. त्यामुळे ते काम व्यवस्थित होणार की नाही अशीही चर्चा नागरिकांतून चर्चिली जात आहे.
      मलकापूर दहिफळ मोहा या रस्त्याचे काम सध्या सुरू असून हे काम शासनाच्या नियमाप्रमाणे होत नसून  निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार दहिफळ ग्रामपंचायत कार्यालयाने अधीक्षक अभियंता पंतप्रधान ग्रामसडक धाराशिव येथील कार्यालयाकडे दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात की काही राजकीय मंडळी त्यामध्ये हस्तक्षेप करून तडजोड करतात हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे?

Post a Comment

0 Comments