Subscribe Us

दहिफळ येथील चोराखळी साठवण तलाव पाणीपुरवठा योजना बारगळण्याच्या मार्गावर?


दहिफळ /तेरणेचा छावा:-
दहिफळ तालुका कळंब येथील ग्रामस्थांच्या नशिबी गेल्या 30 ते 40 वर्षापासून पाण्याचे हाल होताना दिसत आहेत मागील 7 ते 8 वर्षांपूर्वी दहिफळ जवळील बारातेवाडी साठवण तलावातून पाणीपुरवठा योजनेसाठी  लाखो रुपये खर्चून नवीन विहीर गावात, अंतर्गत पाईपलाईन पाण्याची टाकी  बांधण्यात आली तसेच हे काम अर्धवट ताब्यात घेतल्याचे ही ऐकण्यात येत,आहे कारण पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा स्वतंत्र डीपी  बसवायचा असतानाही ही डीपी न बसवता  तसेच अनेक ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन न करता ही  योजना ताब्यात कुणी व कशी घेतली हे सर्व गावकऱ्यांना पडलेले कोडेच आहे.. या कामात जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेने संबंधित पाणीपुरवठा समिती  व गुत्तेदाराला दंडही ठोठावला होता. त्यानंतर गावात काही भागात चार दिवसाला दहा दिवसाला पाणी येत होते, नंतर वीजपुरवठा, पाईपलाईन फुटणे, विहिरीत पाणी नसणे अशा प्रकारे काही दिवस ही योजना बंद,चालू अवस्थेतून दिवस काढत आहे यामुळे अनेक ग्रामस्थांनी स्वतःसाठी बोअर, शेतातून नळ करून आणणे व अनेकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे ही गावकऱ्यांची सद्य परिस्थिती आहे. 
   ही पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी नसल्यामुळे शेजारील चोराखळी तलावातून  गौर दहिफळ संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी 12 कोटी रुपये खर्चून नवीन योजना मागील 30 जानेवारी 2023 या तारखेला कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. या कामासाठी 18 महिन्याची मुदत आहे परंतु आता वर्ष होत आले तरी या कामासाठी दहिफळ हद्दीत साधा एक  टिकाव देखील पडलेला नाही. त्यामुळे या योजनेसाठी फक्त सहा महिने मुदत राहिलेली आहे त्यामुळे या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का का ही योजना बारगळणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. की नंतर शेवटच्या टप्प्यात ही योजना थातूरमातूर करून पहिल्या योजनेप्रमाणे या योजनेचही  चांगभलं होणार असाही प्रश्न सुज्ञ नागरिकातून विचारला जात आहे!? शेजारील  सापनाई ,गौर गावात  जलकुंभ टाकीचे बांधकाम व अंतर्गत पाईपलांचे काम पूर्ण झाल्यात जमा असतानाही दहिफळ मध्ये नेमकं कशात घोड अडलंय? 

Post a Comment

0 Comments