धाराशिव /तेरणेचा छावा:-: येथे ६५ व्या महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवण्यासाठी आबालवृद्धांची क्रीडा संकुलावर प्रचंड गर्दी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रालाच यावर्षीचा 'महाराष्ट्र केसरी ' कोण याची उत्सुकता लागली असून प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे .
19 नोव्हेंबर रविवारी प्रमुख लढती उमरगा -लोहा रा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. ज्ञानराज चौगुले व आयोजक सुधीर पाटील यांच्या हस्ते लावण्यात आल्या तर उभयांतांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले .
या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीर ( अण्णा ) पाटील , कार्यवाहक युवा उद्योजक युवा नेते अभिराम (दादा) पाटील यांनी स्पर्धेसाठी येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला .
या कुस्तीच्या कुंभ मेळ्यामध्ये आजी - माजी नामवंत अशा महान मल्लांची उपस्थिती लक्षणीय होती .
यावेळी भाजप नेते अनिल काळे , विनोद गपाट , युवराज नळे , प्रविण पाठक , मिडिया भाजपा सोशेल मिडिया प्रमुख धनजंय रणदिवे , डॉ.गो विंद कोकाटे ,श्रीकांत साखरे , विक्रम पाटील , बिभिषण पाटील , डी.जी. मळेकर , महाराष्ट्र केसरी पैलवान मगर , वामनराव गाते , दीपक जाधव , अर्जून पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार , महाराष्ट्र उपकेसरी राजाभाऊ मोहोळ , संजय दुधगावकर , उपनिरिक्षक बांगर साहेब , पैलवान राजू मराडकर व अनेक मान्यवर उपस्थित होते , यासर्व मान्यवरांचे आयोजकां डून सत्कार करण्यात आले .
रविवारी झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी गटातील चित्तथरारक कुस्त्यामध्ये
माती विभागात श्रीमंत भोसले , कोल्हापूर विरुद्ध गणेश जगताप हिंगोली तर मतीन शेख , छ संभाजी नगर विरुद्ध तानाजी झुंजुर्के , अमरावती आणि साकेत यादव , पुणे शहर विरुद्ध महिंद्र गायकवाड , पुणे शहर तसेच हर्ष वर्धन सदगीर , नाशिक विरुद्ध वेताळ शेळके , गोंदिया यांच्यामध्ये कुस्त्या झाल्या .
महाराष्ट्र केसरी गादी विभागात उपांत्यपूर्व फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध सारंग सोनटक्के यांच्या लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विजयी तर बालारफिक शेख विरुद्ध संग्राम पाटील लढतीत कोल्हापूरचा संग्राम पाटील विजयी व हर्षद कोकाटे विरुद्ध वैभव रासकर लढत झाली तर तुषार दुबे पुणे जिल्हा विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ मुंबई उपनगर लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला . तर 92 वजन गादी गटात सोलापूर जिल्हयातील बार्शीचा रामा कांबळे विरुद्ध पुणे शहराचा अभिजित भोईर यांच्या लढतीत रामा कांबळे विजयी झाला , हा सुवर्ण पदक व बुलेट गाडीचा विजेता ठरला तर अभिजित भोईर रजत पदक ठरला .
सर्वच मल्ल यांच्यात कडवी झुंज कुस्ती प्रेमींना अनुभवता आली .
0 Comments