धाराशिव/तेरणेचा छावा:-
जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाकडून युवासेना जिल्हाध्यक्ष पदासाठी दोन विभाग केलेले आहेत यामध्ये धाराशिव- कळंब, परांडा- भूम -वाशी या दोन मतदारसंघासाठी एक तर तुळजापूर, उमरगा -लोहारा या दोन मतदारसंघासाठी एक असे दोन विधानसभा मतदारसंघासाठी दोन युवा सेना जिल्हाध्यक्ष पदासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. या पदासाठी डझनभर कार्यकर्ते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे .
धाराशिव कळंब भूम परंडा वाशी या विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी संकेत सूर्यवंशी ,रवी वाघमारे ,दिनेश बंडगर, राकेश सूर्यवंशी , ओंकार आगळे ,राणा बनसोडे हे धाराशिव येथून तर कळंब तालुक्यातून उमेश जाधव,विश्वजीत जाधव, मनोहर धोंगडे, सागर बाराते, सचिन काळे हे इच्छुक आहेत तसेच
परंडा -भूम- वाशी मतदारसंघातून प्रल्हाद आडागळे, बालाजी लाखे सुधीर ढगे यां इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत.
त्यामुळे युवासेना जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे, ही निवड कोणाच्या मर्जीने होणार नसून आज पर्यंत पक्षासाठी केलेल्या कामावर होणार असल्याचे संकेत मिळू लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपण केलेल्या कामाची फाईल पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ करत असल्याचे तसेच मीच कसा या पदासाठी योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकांनी आपापल्या मर्जीतल्या नेत्याकडून शिफारशीसाठी प्रयत्नशील असल्याची समजते. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या फुटी नंतर अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या असतानाही शिवसेना (उबाठा) गट सत्तेत नसतानाही या पदासाठी मोठी रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघातील कार्यकर्त्याला संधी भेटणार की उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या आ.कैलास पाटील यांच्या धाराशिव कळंब मतदार संघाला संधी मिळणार हे लवकरच समजणार असले तरी नावाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे अनेक जणांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
0 Comments