Subscribe Us

लोकसहभागातून वाचनालयाची संकल्पना 'रीड धाराशिव ' नाविन्यपूर्ण उपक्रम ' ग्राम शिक्षण केंद्रा 'चे गौर येथे उद्घाटन .

 दहिफळ/तेरणेचा छावा:-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार योग्य अंमलबजावणीसाठी व मुलांचा शैक्षणिक विकास, पालक व ग्रामस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी गाव स्तरावर शैक्षणिक चळवळ निर्माण करण्यासाठी व मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या उद्देशाने डॉ . सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी उस्मानाबाद आणि मा . राहुलजी गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद उस्मानाबाद . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने गाव व शाळा यांच्या सहभागाने 'रीड धाराशिव' हा उपक्रम राबविण्यात येत आहे .सदर उपक्रमाचे उद्घाटन आज कळंब तालुक्यातील गौर गावांमध्ये ग्रामशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी मा .राहुल गुप्ता  यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच सौ.सुषमाताई देशमुख व उप सरपंच सौ ज्ञानेश्वरी लंगडे जिल्हा प्रशिक्षण व जिल्हा प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथील प्राचार्य मा . जेटनुरे  तसेच गटविकास अधिकारी मा.चकोर  गटशिक्षणाधिकारी काळमाते  शिक्षण विस्ताराधिकारी माळी  व भारत देवगुडे साहेब शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच ग्रामसेवक, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक सुनील मुंडे  शाळेतील शिक्षक वृंद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन जिल्हा समन्वयक सतीश शिंदे ,राहुल मोडके यांची उपस्थिती होती .       कार्यक्रमांमध्ये गौर ग्रामपंचायत  व ग्रामस्थ , शालेय व्यवस्थापन समिती व शाळा यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावातून 'एक घर एक पुस्तक ' यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पुस्तके व पुस्तकासाठी निधी जमा करण्यात आला इतर साहित्य घेण्यात आले . तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत या वाचनालयासाठी शंभर पुस्तकाची कीट देण्यात आली. सदर उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना गाव व शाळा हा ग्रामीण शिक्षणाचा महत्वाचा पाया असून पालकांच्या समन्वयाने मुलांच्या शिक्षणासाठी हे ग्राम शिक्षण केंद्र निश्चितच शैक्षणिक चळवळ निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला . लोकसभागातून गावाला उपलब्ध होणाऱ्या पुस्तकाचा साठा हा अतुलनीय होईल सोबत जिल्हा परिषद मार्फतही पुस्तकाची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. विद्यार्थ्याकरिता सदर केंद्र आठवड्यातून दोन दिवस ठरवून दिलेल्या तासात विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल .शाळेतील विद्यार्थ्यासोबतच गावातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा व इतर मार्गदर्शन कथा , कादंबऱ्या इत्यादी अनेक पुस्तकाचा खजिना ग्राम शिक्षण केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध केलेला असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहान केले . सदर केंद्रासाठी आवश्यक ग्रंथाची उपलब्धता गावातील सरपंच, मुख्याध्यापक , गटविकास अधिकारी ,शिक्षण विस्तार अधिकारी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने झाली आहे याकरता त्यांचे अभिनंदन करण्यात आले . विद्यार्थ्यांना बालपणीच वाचनाची सवय निर्माण व्हावी व वाचनाची आवड निर्माण व्हावी मोबाईल पासून दूर राहून पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोयीचे होईल . तसेच मुलांसोबत पालकाचे सुद्धा ज्ञान वाढून उद्‌बोधन होईल यासाठी मुलाबरोबर पालकांनीही वाचन करावे असे आवाहन प्राचार्य डायट उस्मानाबाद जेटनुरे  यांनी केले .सदर ग्राम शिक्षण केंद्र नियमितपणे व सुरळीत चालवण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत गावातील स्वयंसेवकाची तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची निवड करून वाचनालय चालवण्याची व पुस्तकांची  देवानघेवाण करण्याची जबाबदारी सोपवावी असे सांगण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माने तर जावळे  यांनी कार्यक्रमाचे आभार जावळे  मानले  .

Post a Comment

0 Comments