Subscribe Us

व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सत्कार


धाराशिव / तेरणेचा छावा:-
पत्रकारांना त्यांच्या हक्काचे घर, त्यांच्या पाल्याला  शिक्षण ,पेन्शन संरक्षण मिळावे, पत्रकार महामंडळाची स्थापना करावी या उद्देशासाठी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना  संदीप काळे यांनी 2 वर्षांपूर्वी केली ,  संघटनेचे देशभरात 33,000 पत्रकार सभासद आहेत संघटनेच्या या कृतीशील कार्यक्रमामुळे महाराष्ट्र व देशातील नंबर एकची पत्रकार संघटना म्हणून  अल्पावधीतच ओळख निर्माण  झाली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या साप्ताहिक , डिजिटल, रेडिओ अशा प्रकारच्या 24 विंग कार्यरत आहेत. या संघटने मार्फत सध्या मुंबई येथे चार ते पाच पत्रकारावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पत्रकारासाठी आर्थिक विकास  महामंडळासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत असून त्यामुळे लवकरच महामंडळ करण्याच्या तयारीत शासन असल्याचे दिसून येत  आहे,पत्रकारांच्या अडीअडचणीसाठी ही संघटना तत्पर असल्याने प्रत्येक सभासद पत्रकाराला  संघटना माझीच आहे असा आत्मविश्वास संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी निर्माण केलेला आहे. 
   व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा साप्ताहिक विंग कडून मंगळवार (दि.25 जुलै) रोजी कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपादक, पत्रकारांना  विमा पॉलिसी वाटप व  आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी  करण्यात आली, यावेळी ज्येष्ठ संपादक /पत्रकार गणेश शिंदे व सुभाष घोडके यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारिणीची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी उपस्थित सर्व संपादक पत्रकार यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. 
       या कार्यक्रमालाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव चे तहसीलदार डॉ.सदानंद बिडवे तर प्रमुख पाहुणे  व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे ,प्रमुख उपस्थिती धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.तुषार वाघमारे , व्हॉइस ऑफ मीडिया शिक्षण मदत विभागाचे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, मराठवडा उपाध्यक्ष  अमर चोंदे धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते यांची कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थिती होती. 
धाराशिव जिल्ह्यात प्रथमच सहकुटुंब संपादक पत्रकारांचा  कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय जिवा सेना संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे व त्यांच्या टीमने साप्ताहिक विंग जिल्हा कार्यकारिणीचा सत्कार  केला. 
        प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मते यांनी तर सूत्रसंचालन शरद आडसुळ यांनी व उपस्थितांचे आभार ज्योतीराम निमसे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील साप्ताहिकाचे संपादक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments