धाराशिव/तेरणेचा छावा:-
धाराशिव : महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली असून धाराशिव जिल्ह्यातही पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात पोलीस पाटील संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात पोलीस पाटील यांची अनेक गावातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका-एका पोलीस पाटलाकडे दोन-तीन गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावाचे आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातही तात्काळ पोलीस पाटील भरती राबवावी, जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पोलीस पाटील भवन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, पोलीस पाटलांचे नुतनीकरण विनाविलंब करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, सचिन जाधव, चंद्रकांत मगर, परशुराम यादव, अजित मंडलिक, मोहन गुरव, शाम पाटील यांचा समावेश होता.
0 Comments