Subscribe Us

जिल्हा स्त्री रुग्णालयातील आय सी यु व लहान बाळांचे अतिदक्षता विभाग तात्काळ उपलब्ध करावे. धाराशिव ए आय एम आय एम ची पालकमंत्री कडे मागणी


धाराशिव/तेरणेचा छावा:- जिल्हाभरातून  तसेच बार्शी तालुक्यातून ही डिलिव्हरी साठी महिला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे येतात मात्र त्या ठिकाणी आयसीयू सेवा उपलब्ध नसल्याने त्या रुग्णास सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. सोलापूरचे पाठविल्यामुळे नागरिक परेशान होऊन शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जात असल्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो व तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय येथे व्हेंटिलेटर उपलब्ध असून ते अज रोजी देखील सुरु करण्यात आलेले नाही. लहान जन्मलेल्या बाळास स्त्री रुग्णालयात असलेल्या आयसीओ केंद्रामध्ये व्हेंटिलेटर अतिदक्षता विभाग तात्काळ सुरु करण्यात यावे. 
ह्या मागणीचा निवेदन पालकमंत्री तानाजी सावंत यांना उस्मानाबाद एआयएमआयएम च्या वतीने देण्यात आला 
यावेळी जिल्हाध्यक्ष मुस्तफा खान, तालुका अध्यक्ष मोहसीन शेख, अजहर मुजावर जमीर खान, अल्फाज शेख युवा शहराध्यक्ष, जमीर शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments