Subscribe Us

संभाजी ब्रिगेडच्या वतीने कळंब येथे छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न


कळंब/तेरणेचा छावा:-
     येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युगप्रवर्तक कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम ध्वजारोहन करुन सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करुन 
त्यांचे मस्तकी विविध प्रकारची फुले आणि शेतातील नऊ प्रकारच्या धान्याचा अभिषेक करण्यात आला. तसेच याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष मा.ॲड.पुरुषोत्तमजी खेडकर साहेब लिखित 
"ञिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेक महात्म्य" या ग्रंथाचे प्रकाशन करुन मिठाईचे वाटप करण्यात आले.
    यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड तानाजी चौधरी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय कवडे,
शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, पोलिस निरीक्षक श्री.साबळे, श्री. कोळेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य जगदीश गवळी, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी अडसूळ, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर कुरडे पाटील, तालुकाध्यक्ष अनिल फाटक, विकास गडकर पाटील,चोंदे अप्पा, विलास गुंठाळ, सागर बाराते, गुलाब शेख, कवडे महाराज, पुरी महाराज, प्रशांत लोमटे, शिवाजी शेंडगे,बळी चव्हाण, अमोल   पवार,भीमा हगारे, बाळासाहेब कथले, यश सुराणा इत्यादिंसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments