आठवणीतील अण्णा.
दहिफळ/तेरणेचा छावा:-
तेरणा नदीच्या काठावर वसलेले दहिफळ गाव
याच गावचे पोलिस पाटील म्हणजेच बिभीषण (अण्णा)पाटील ३५ वर्षाच्या कार्यकाळात गावातील तंटे गावातच मिटवून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला.
एक ही पोलिस केस होऊ दिली नाही.खरं तर अण्णांचा स्वभाव शांत संयमी होता.साधे राहणीमान.तीन गुंड्याचा लांब सदरा.पांढरी पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी,काळा चष्मा.असा पेहराव.समोरची व्यक्ती लहान असो वयस्कर त्याचे म्हणणे ऐकून मग ते बोलायचे.शिक्षण असो की व्यवसाय, घरगुती असो की सामाजिक विषय चर्चा करताना सकारात्मक विचार ते मांडायचे.
गावचे पोलिस पाटील म्हणून त्यांनी ३५ वर्ष गावचा कारभार पाहिला.गावातील कुठलाही विषय असो ते सामोपचाराने तोडगा काढायचे.गावातील विषय गावातच मिटला पाहिजे.कोर्टाची पायरी कुणाला चढु दिली नाही.
घरगुती भांडणे होत असतात.परंतु टोकाची भूमिका घेऊन जर एखाद्याचा संसार मोडत असेल तर सगळे कुटुंब एकत्र करून समजून सांगून वादाने वाद वाढतो.प्रेमाने प्रेम वाढते.रागाच्या भरात उचलले पाऊल राखरांगोळी करुन टाकते.वडीलधारी मंडळींना सोबत घेऊन चर्चा करून घरातील वाद अण्णा मिटवत असत.
तसं माझं बालपण पाटलाच्या वाड्यात गेले.वाड्याला लागुन आमची गल्ली.शाळेतून घरी आलं की टि व्ही बघायला चार पाच पोरं अण्णांच्या वाड्यात गेलोच म्हणून समजा.पोरं वाड्यात आली म्हणून कधी कुणीच आमचा राग राग केला नाही.
तसं बघायला गेलं तर आमच्या घरच्यांचा व पाटील यांच्या घराण्यांचा चांगला संबंध होता.आमचे आजोबा काही दिवस सालाने होते.परंतू पारंपरिक व्यवसाय लोहार की काम शिकले व बिभीषण अण्णा यांच्या मोकळ्या जागेत आजच्या बाजार मैदणापासुन काही अंतरावर आडसुळ यांचे हाॅटेल आहे.त्याच ठिकाणी आमचे काम चालत असे.मी जन्माच्या आधीपासूनच तिथे आजोबा काम करत होते.मी लहाणाचा मोठा तिथेच झालो.मला लहान पणी पेढा आवडायचा.दुकाणावर कुणी मोठं माणुस आलं की मी पेढा मागायचो.मला आजही चांगलं लक्षात आहे.अण्णांनी मला जवळ बोलावून सांगितले.अरं असं कुणाला भी मागायचं नसतं.हा घे रुपया जा पेढा खा.मी मान हालवत पेढा आणायला पळत गेलो.त्या दिवसांपासून मागायची सवय मोडली.
चांगल्या विचारांच्या माणसांची संगत लाभली की चांगलेच संस्कार होत असतात.अण्णांचा सहवास मला जवळून लाभला.
आधी मधी आजही अण्णाची भेट चौकात असलेल्या रवी फुटवेअर म्हणजे बुट चपलाच्या दुकाणी भेट व्हायची.ते स्वताहून विचारायचे काय चालु आहे तुझं.मी चांगलं काम चालू आहे.बरं आहे सगळं.जुन्या आठवणी ते सांगायचे.लय कष्ट केले तुझ्या आज्याने.जोड नव्हती कारागीला.वडील गेला तुझा चांगला होता.जून्या आठवणी भावूक होऊन अण्णा सांगायचे.न कळत माझे डोळे पाणावायचे.
अगदी जवळून अनुभवलेले पाहिलेले अण्णा दि ३१ हे २०२३ रोजी साडे अकराच्या सुमारास कायमचे सोडून गेले.
खरं तर व्यक्ती हयात असताना किंमत कळत नाही.शेवटच्या क्षणाला भुतकाळ आठवतो.तो व्यक्ती आठवतो.घालवलेले क्षण आठवतात.
आम्ही सिनेमात पाटील सावकार बघतो.खलनायक म्हणून बघायची सवय असते.तसे काही घडत ही असेल परंतु बिभीषण अण्णा सारखे पाटील वेगळेच असतात.
साध्या सुपारीचे व्यसन नव्हते अण्णांना.कधी रागावून बोलने नाही.धीर गंभीर आवाज.मार्गदर्शक स्वभावाचे अण्णा काल काळाच्या पडद्याआड गेले.गावावर शोककळा पसरली होती.अंत्यविधीला हजारो समाज जमला होता.आपण काय कमावले हे याच क्षणाला कळाले.हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.हीच तुमच्या कार्याची पोचपावती होती.अखेरचा सलाम द्यायला तुमचे दर्शन घेण्यासाठी हा जनसागर लोटला होता.दीड महिन्याच्या दवाखान्यातील उपचाराने तुम्ही बरे झाले नाहीत.एक चांगले व्यक्ती तुम्ही होतात.पोलिस पाटील कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अण्णा फक्त तुम्हीच.तुमची सर कुणालाच येणार.जेव्हा जेव्हा पोलिस पाटील हा शब्द समोर येईल तुमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.तुमचे कार्य दहिफळकर कधीच विसरणार नाहीत.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो......
भावपूर्ण श्रद्धांजली अण्णा🙏🙏🙏🙏🙏🙏
-योगराज पांचाळ दहिफळकर
७७४१०६७९७३
0 Comments