Subscribe Us

दहिफळ ग्रामसभा विविध कारणाने गाजली.


 ग्रामपंचायत समोर बसलेली ही बैठक नव्हे ही आहे ग्रामसभा. 
   सुरुवातीस काही वेळ थांबून ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे फिरवली पाठ

धाराशिव /तेरणेचा छावा:-
तिर्थक्षेत्रासाठी ११लाख ५० हजार निधी मंजूर
अतिक्रमणामुळे  विकास कामाला अडथळा.

अतिक्रमणधारकांना नेमकं पाठीशी घालतय कोण? 

विद्युत उपकेंद्राचे अभियंता पाटील यांची बदली करण्याची मागणी.

 प्राथमिक आरोग्य केंद्रातील घडलेल्या प्रकारावर ग्रामसभेत चिडीचूप का? 

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे दि.८/५/२०२३ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभा घेण्यासाठी जाहीर निवेदन दिले होते.परंतु ग्रामस्थांची उपस्थिती म्हणावी अशी नव्हती. नाही. 
शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आली.पहिल्या ग्रामसभेत घेतलेले विषय ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच चरणेश्वर पाटील यांनी वाचुन दाखविले.
तसेच २०२२/२३ मध्ये आलेला निधी जमा खर्च ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आला होता.ग्रामविकास अधिकारी झांबरे यांनी जमा खर्च वाचुन दाखविला.तसेच म.ग्रा.रो.योजना अंतर्गत मंजूर कामाविषयी चर्चा झाली.मंजुर कामाला ठराव घेऊन मंजुरी देण्यात आली.
प्रत्येक ग्रामसभेमध्ये वादग्रस्त विषय म्हणजेच अतिक्रमणाचा विषय चर्चेत असतो.बाजार मैदानावरील अतिक्रमण, तसेच खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्यास संबंधित नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित असते.ग्रामपंचायतने नोटीसा बजावल्या होत्या परंतु कुठलीच हालचाल झालेली नाही.श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचा विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार आहे.मोठा निधी उपलब्ध झाला आहे.अतिक्रमणामुळे भक्त निवास व विविध विकास कामे रखडली आहेत.
    ग्रामस्थांनी सहकार्य केले तरच विकास कामे होतील.
झालेले अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच चरणेश्वर पाटील यांनी केले आहे.
 तुकाराम भातलवंडे यांनी खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा विषय मांडला होता.ग्रामसभेत याविषयी स्पष्टीकरण वरील सरपंच चरणेश्वर पाटील यांनी दिले आहे. परंतु अतिक्रमणाबाबतीत गोल गोल भूमिका कोण घेऊन अतिक्रमणधारकांना कोण पाठीशी घालताय असा सूर ही जनतेतून ऐकवायची येत आहे, गावात ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत बाजारकरूसाठी  शौचालय  उभारणी करता नागरिक अडचणी करीत असताना ग्रामपंचायत  कचखाऊ भूमिका घेत असतील तर मग अतिक्रमण  विषयी तर न बोललेलेच  बरं कारण ग्रामपंचायत आपल्या अधिकाराचा वापर करण्यास कुचराई  नेमकं कोणाच्या भल्यासाठी  करत आहे, असाही प्रश्न सुज्ञ नागरिकातून विचारण्यात येत आहे. 
पाणी टंचाई निर्माण झाली होती.यासाठी गावातील दोन बोअरवेल अधिग्रहण केल्याचे सांगितले.
तसेच कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यासाठी नवीन जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.परंतु विहीरीसाठी जागा उपलब्ध नाही.यासाठी गौर /दहिफळ ग्रामपंचायतने जागा संपादित करावी असा आदेश आहे.यासंबंधी ग्रामसभेत चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
विहीरीचे काम पूर्ण झाले की दोन्ही गावांना पाणी पुरवठा होणार आहे.
      तसेच गावातील विद्युत उपकेंद्राचे अभियंता पाटील ग्राहकांना उद्धट भाषेत बोलतात.तक्रारी समजून घेत नाहीत.अनेक अडचणी येत आहेत.पाटील यांची बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.बदलीचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी  आरोग्य केंद्रातील घडलेल्या प्रकारावर ग्रामसभेत नेमकी चिडीचूप कशासाठी झाली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावरची पुढील प्रक्रिया पूर्ततेसाठी काही ठोस उपाय योजनेसाठी काही चर्चा का झाली नाही अथवा याविषयी काही ठरावासाठीही कोणीच काही का बोलली नाही असाही सवाल एकावयाची येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पाणी कुठे मुरलय असा सूर एकावयात येत आहे. 




Post a Comment

0 Comments