-औषधाची तारिख संपली असतानाही औषधे जमा केली नाहीत.
औषध निर्मत्यावर होणार कारवाई
-प्रशासकीय दप्तरात घोळ.कश्याचाच कशाला लागेणा मेळ.
-जलशुध्दीकरण यंत्रणा बसवली असताना बंद अवस्थेत.
-रुग्णांना पाण्याची व्यवस्था नाही.
चौकशी करताना अधिकारी ही झाले हवालदिल.
दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारीमुळे आरोग्य विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा तपास सुरू आहे.खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवार (दि.९ मे ) रोजी दुपारी ४ वाजता अचानक भेट दिली.
यावेळी कर्मचारी यांचे हजेरी पुस्तक तपासून डिलेव्हरीची नोंद वही तपासली.यावेळी बरीच तफावत आढळून आली.सर्व दप्तर तपासुन झाल्यानंतर औषध वितरण कक्ष व भंडार गृहाला भेट दिली.यावेळी औषध साठा किती आहे.कोणती औषधे आहेत हे बघत असताना पहिलाच बाॅक्स तपासताना त्यावरील तारिख संपली असल्याचे दिसून आले.नागरिकांच्या अनेक वेळा तक्रारी होत्या की औषधे उपलब्ध नाहीत.संपली आहेत.असे कारण सांगण्यात येत होते.आज तपासणी दरम्यान औषधे असताना रुग्णांना दिली जात नव्हती.जाग्यावर तारिख संपली परंतु औषध वितरण केले जात नव्हते.
औषध निर्मत्यावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले.तसेच प्रयोग, रुग्ण कक्षाला भेट दिली.यावेळी एक रुग्ण उपचारासाठी दाखल केलेला होता.भिंतीवर केसपेपर लावण्यासाठी व्यवस्था केली असतानाही त्यावर केस पेपर लावलेला नव्हता.
स्वच्छता गृह शस्त्रक्रिया कक्षाला, रुग्णांसाठी स्वच्छ शुद्ध पाणी भेटावे यासाठी ग्रामपंचायतने आरो बसवलेला आहे परंतु धुळखात आरो मशिन पडून आहे.एकुण सर्व पाहणी केली असता व उपस्थित नागरिकांची तक्रारी ऐकून या आरोग्य केंद्रात कारभार कसा चालतो याची प्रचिती खुद्द मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे.नवीन वैद्यकीय अधिकारी लवकरच रूजू होतील.नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दवाखाना असतो.नागरिकांनी विश्वास ठेवावा
चांगला स्टाफ दिला जाईल असा विश्वास दिला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुलदिप मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद जे एन, सरपंच चरणेश्वर पाटील, उपसरपंच अभिनंदन मते, सदस्य बालाजी गोरे, नागरिक फुलचंद काकडे, फुलचंद पाटील, शिवशंकर भातलवंडे,बापु गवळी यांनी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments