दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि ५मे रोजी घडलेल्या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.डाॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा जीव गेला होता.या घटनेमुळे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला व दवाखान्या समोर ठिय्या धरून आंदोलन केले.जोपर्यंत संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही यावर ग्रामस्थ ठाम राहिले.
जास्त वातावरण बिघडू नये म्हणून येरमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अतुल पाटील, उपनिरीक्षक वाटोरे,बीट अंमलदार चाफेकर, कर्मचारी शिंदे,काळे, कोळी,कांबळे , कोष्टी, जमादार, उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद यांनी भेट दिली व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.तसेच सरपंच चरणेश्वर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर लेखी निवेदन दिले. व फोन द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनाक्रम सांगितला डाॅक्टर जर सेवा देण्यासाठी वेळ देत नसतील तर यांचा काय उपयोग.आमच्या व्यक्तीचा नाहक बळी गेला.
सर्व स्टाफ बदलावा व सर्वावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली .
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फोन द्वारे वरिष्ठांची संपर्क साधून दोन वैद्यकीय अधिकारी व क्लार्क आरोग्य सहाय्यकाची तात्काळ बदलीचे आदेश दिले..दोन सुट्ट्या आल्यामुळे इतरांवर सोमवारी कार्यवाही करण्यात येईल असे डॉ.सय्यद यांनी सांगितले आहे.
मयत व्यक्तीला आरोग्य सेवा तर मिळालीच नाही परंतु शेवटच्या घटकेला सुध्दा ताटकळत ठेवावे लागले. आरोग्य सेवेसाठी ऑपरेशन पोस्टमार्टम साठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर इन्वर्टर व जनरेटरची सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्चून उपकरणे दिलेली असतानाही येथील काही उपकरणे धुळखात तर काही गायब असल्याचे दिसून आली. कोविड काळातील प्रशासनाने व ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेली उपकरणे येथे सरपंच व ग्रामस्थांना दिसून न आल्यामुळे ग्रामस्थ जास्त आक्रमक झाले त्यामुळेच पुढील वातावरण तापले, परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच तत्परता दाखवत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले व पुढील प्रक्रिया पूर्ण झाली.
वैद्यकीय अधिकारी यांनी कामात कुचराई केली.नाहक आमचा एक शेतकरी गेला.जोपर्यंत चांगला स्टाफ मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील.
संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ग्रामस्थांनी मागणी केली आहे .यावर वरिष्ठ अधिकारी यांनी विचार करावा.
-सरपंच चरणेश्वर पाटील.
पी एम रुममध्ये लाईट व्यवस्था नव्हती. परिसरात कचरा साचला होता. दवाखान्यात इन्व्हर्टरची सोय असताना प्रकाश योजना नाही.यामुळे दवाखाना परिसरात अंधार होता. पी एम रुममध्ये तर चक्क अंधार होता.मोबाईलच्या बॅटरीवर शिवच्छेदन सुरू होते. परिस्थितीची जाणीव ठेवून उपस्थित पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांनी आपली गाडी पी एम रुमसमोर उभा करून प्रकाश योजना उपलब्ध करून दिली. पोलीस व्हॅनच्या उजाडात पी एम करण्यात आले.पी एम करताना गावातील तात्या भातलवंडे, गणेश भातलवंडे, माऊली खंडागळे यांनी सहकार्य केले.
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी अभार मानले आहे.
0 Comments