Subscribe Us

उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात प्रथम



मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी केले अभिनंदन

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत G2C व B2C सेवा निर्गमीत करण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात प्रथम
धाराशिव/तेरणेचा छावा:-

        राज्य शासनाने ग्रामपंचायतीचे G2C व B2C सेवा अंतर्गत विविध दाखले उतारे निर्गमीत करण्याकरीता विकसीत केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून उस्मानाबाद जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा निर्गमीत करुन प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रामस्थांना व्यावसायिक डिजीटल सुविधा पुरविण्यात देखील उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दि. 19 मे 2023 रोजी राज्यस्तरीय आढावा बैठकीत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे विशेष अभिनंदन केले.
                  जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत सातत्याने महाईग्राम पोर्टल व CITIZEN CONNECT APP बाबत ग्रामस्थामध्ये जनजागृती करण्याचे काम सुरु असून नागरिकांना या ॲपचा जास्तीत जास्त वापर करून याव्दारे कर आकारणीची मागणी करणे व विविध दाखल्यांची मागणी करण्याबाबत प्रेरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले आणि आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक अमर क्षिरसागर यांच्या प्रयत्नामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेने हे यश प्राप्त केले आहे.
                 उस्मानाबाद जिल्हा परिषद मार्फत आपले सरकार सेवा केंद्रातून नागकिांना 1 लाख 19 हजार 935 इतके व्यवसाय ते ग्राहक सेवा (B2C Services) देण्यात आले, 79 हजार 852 इतके महा ऑनलाईन सेवा (MOL Services) देण्यात आले, 5 हजार 762 इतके Services Plus च्या सेवा देण्यात आल्या आणि 2 लाख 21 हजार 475 इतके Mahaegram Services (स्वयंघोषना पत्र, जम्म-मृत्यू, निराधार व इतर दाखले) निर्गमित करण्यात आले. व्यावसायिक सेवा असे एकूण 4 लाख 27 हजार 24 इतके सेवा ग्रामस्थांना पुरविण्यात आले आहेत. राज्यात उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांनी CITIZEN CONNECT APP व्दारे व्यवहार करुन सेवा मिळविली.    ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे नमुना क्रमांक 8 (ॲसेसमेंट रजिस्टर) व नमुना क्रमांक 9 (वार्षीक कर मागणी) पूर्ण करण्याकरीता नियमीत स्वरुपात आढावा घेतल्याने हे यश प्राप्त झाले आहे.
                B2C सेवा अर्थात व्यावसायिक सेवा अंतर्गत विविध प्रकारचे रिचार्जेस करणे, ऑनलाईन पेमेंट करणे, टिकीट बुकींग करणे, पीक विमा भरणे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करणे, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करणे, बँक व्यवहार करणे, विविध योजनेकरीता लाभार्थ्यांची नोंदणी करणे आणि इतरही अनेक प्रकारच्या सेवांचा यात समावेश होतो. या सेवा पुरविण्यातही उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
                                                    

Post a Comment

0 Comments