Subscribe Us

महिलांनी पुढाकार घेतला तरच घरगुती हिंसाचार थांबेल- हीना शेख


दहिफळ / तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धा,भाषण स्पर्धा, खो-खो स्पर्धा,दोरीवरच्या उड्या, संगीत खुर्ची, पाककला, उखाणे स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.गावातील बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.स्पर्धेमध्ये क्रमांक मिळविलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून  भरोसा सेल व महिला छेडछाड विरोधी पथक धाराशिव प्रभारी अधिकारी हीना शेख (PSI) उपस्थित होत्या.महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की,
आज मोबाईलच्या युगात खूप बदल होत आहेत.सोशल मिडीयामुळे अनेक प्रकार घडत आहेत.नवरा बायकोत संशय भांडणतंटे वाढत आहेत.महिलांनी मोबाईल कामाव्यतिरिक्त जास्त वापरू नये.घरातील काम बघत आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच आपल्या मुलांवर लक्ष द्यावे.लहान गोष्टी मुळे घरात भांडणे होतात.सतत महिलांना ग्राह्य धरले जाते.घरातील पुरुष मंडळी मारहाण करतात.सतत मारहाण करणे कायद्याने तो गुन्हा आहे. महिला मुकाट्याने सहन करतात.तक्रार करत नाहीत.याचा परिणाम मोठा होतो.मारहानीत महिलांना जीव गमवावा लागतो.महिला सुरक्षा कायद्याअंतर्गत आपली सुरक्षा होऊ शकते.अन्याय अत्याचार सहन करू नका.११२ नंबरवर फोन करा तक्रार केली म्हणून काही होणार नाही.आम्ही कुटुंबातील सदस्यांना समज देतो.कुटुंबात एकोपा वाढीस लागवा यासाठी आमचा प्रयत्न असतो.त्यामुळे न घाबरता अन्याय अत्याचार होत असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा तरच घरगुती हिंसाचाराला आळा बसेल.हिंसाचार थांबेल असा आशावाद व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
येथील रामचंद्र महाराज मठात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments