Subscribe Us

संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा


कळंब / तेरणेचा छावा :-तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जिल्हा धाराशिव येथे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
   सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कळंब न्यायालयाचे सरकारी वकील भाग्यश्री मुंडे  व ॲड शकुंतला फाटक , ॲड.स्मिता गवळी  तसेच राजश्री देशमुख , सौ कांचन जोशी, ॲड.आम्रपाली भावे  या उपस्थित होत्या.
तसेच  शाळेतील माजी विद्यार्थिनी सौ. राजश्री श्रीनिवास सांगळे हिचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तिचे  इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण संत ज्ञानेश्वर महाराज  निवासी मुकबधिर विद्यालयामध्ये पूर्ण झालेल्या असून ती राज्यस्तरीय खेळाडू म्हणून शाळेचे नाव उज्वल केलेले आहे. 
तिचा आता सध्या सुखी संसार चालू असून तिला नॉर्मल मुलगी झालेले आहे, त्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच  शाळेत दोन विद्यार्थी शिकत असलेल्या पालक रेखा पवार यांनी गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना उत्तम पद्धतीने शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतात व आपला प्रपंच चालवताना, मुलावरील वडिलांचे छत्र हरवलेले असून त्या हिमतीने मुलांचा व स्वता चा उदरनिर्वाह चालवत असतात त्याबद्दल विशेष सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक आश्रुबा कोठावळे यांनी केले व सूत्रसंचालन श्रीमती गुंड सुनिता यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर  व विशेष शिक्षक गणेश फरताडे विशेष शिक्षिका सुनंदा गायकवाड, तुकाराम आडसुळ, अंकुश गव्हाणे, सरस्वती देवकर, मंगल कसबे, राणी गोरे, रंजना उंद्रे शाळेतील विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments