बार्शी/ तेरणेचा छावा:-
आयुष व्यसनमुक्ती व संशोधन केंद्र जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे व्यसनमुक्तीसाठी किफायतशीर व परिणामकारक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी 2017 पासून संशोधन केले जाते या संशोधन कार्याची एम्स हॉस्पिटल नवी दिल्ली येथील नॅशनल ड्रग डीपी डान्स ट्रीटमेंट सेंटर मध्ये झालेल्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती परिषदेत दखल घेऊन आयुषचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप तांबारे यांना परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते तर नितीन कुमार आळंदकर कविता अंधारे,मृणालिनी मोरे, गणपतसिंग परदेशी , बापूराव हुलुळे या तज्ञांना त्यांनी केलेले शोध प्रबंध 10ते11 मार्च दोन दिवशीयपरिषदे समोर मांडण्यासाठी आमंत्रित केले होते.
या परिषदेमध्ये चिकित्सालयिन मनु शास्त्रज्ञ आळंदकर यांनी स्वभाव दोषामुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता या विषयाचे संशोधन सादर केले
आहारतज्ञ कविता अंधारे यांनी व्यसनामुळे निर्माण होणारे कुपोषण व त्यावरील योग्य आहार पद्धती याविषयी केलेले संशोधन सादर केले. मृणालिनी मोरे यांनी व्यसनमुक्ती उपचारात कुटुंबाचा सहभाग असल्यास नक्कीच यश मिळते हे सिद्ध केले. सामाजिक कार्यकर्ते गणपत सिंग परदेशी यांनी व्यसनमुक्ती उपचारानंतर योग्य पाठपुरावा करून व्यक्तींचे पुनर्वसन केल्यास तो पुन्हा व्यसनाकडे वळत नाही याविषयी प्रबंध मांडला .
मॅनेजर बापूराव हुकुले यांनी व्यसन सोडताना औषधासोबतच आहार ,विश्रांती, विश्वास ,अशा गोष्टी रुग्णांना दिलास त्याला दारूच्या वियोग लक्षणाचा त्रास होत नाही हे सिद्ध केले. कुटुंब समुपदेशक प्रियंका शिंदे यांनी व्यसनामुळे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील प्रभावी उपचार पद्धती यांची मांडणी केली .डॉ. संदीप तांबारे यांनी व्यसनमुक्ती व्यवस्थापन वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड नेशन येथून व्यसनमुक्ती व्यवस्थापन पीएचडी प्राप्त करून सर्व सहकार्यांना व्यसनमुक्ती संशोधनात मार्गदर्शन केले तसेच अद्ययावत उपचार पद्धती आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव येथे हजारो व्यसनाधीनावर किफाय चीर व परिणामकारक उपचार केलेले आहेत आहेत म्हणून त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली दोन दिवस चाललेल्या परिषदेच्याअध्यक्ष प्रोफेसर एलियन सुमन एम सी एन डी डी टी सी चे प्रोफेसर राखेत चड्डा प्रोफेसर प्रभू दयाल यांच्यासह देशातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य करणारे 250 तज्ञ उपस्थित होते.
बार्शी सारख्या ग्रामीण भागातून आयुषने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संशोधकाचे अभिनंदन होत आहे.
0 Comments