Subscribe Us

तेरणा नदीच्या पात्रात साचला गाळ, नदी खोलीकरणाची गरज.


दहिफळ / तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ सापनाई शिवारातुन तेरणा नदी गेलेलेली आहे.तेरखेडा पासुन ह्या नदीचा उगम झालेला आहे.या नदीचे पाणी तेर धरणात पाणीसाठा होतो.तसेच उर्वरित पाणी लातूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाते.किती ही मोठा पाऊस काळ झाला तरी या नदिच्या पात्रात पाणी साठवून राहत नाही.सध्याच्या परिस्थितीत नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी गाळ साचला आहे.पात्राची खोली कमी कमी होत आहे.तसेच तेरणा नदीपात्रात अतिक्रम ही बरेच झालेले आहे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असतो.नदीच्या पात्रात पाणी मावत नाही शेजारील शेतात पाणी पसरते.यामुळे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
अनेक वर्षांपासून या नदी पात्रातील गाळ काढलेला नाही.तसेच बऱ्याच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले होते त्याचीही दुरावस्था झाली आहे.बंधाऱ्याला दरवाजे नाहीत.भिंतीची पडझड झाली आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पात्राचे खोलीकरण केले तर पाणी साठवून राहील.या भागात दुसरा पाणी स्त्रोत नाही.साठवण तलाव नाहीत.तेरणा नदी गावाजवळ असुन पाणी मिळत नाही.
एके काळी याच तेरणा नदीच्या पाण्यावर तेरणा साखर कारखाना चालत होता.याच नदीच्या पाण्यावर उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती.
साखर कारखाना बंद पडला.उसाचे क्षेत्र घटले.व तेरणा नदीच्या विकास कामाकडे दुर्लक्ष झाले.
पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या कडे तेरणा साखर कारखाना गेला आहे.लवकरच तो सुरू होईल.यामुळे हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.याच प्रमाणे शेतकऱ्यांची जलवाहिनी असणाऱ्या तेरणा नदीच्या विकासासाठी प्रयत्न व्हावा.लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांनी लक्ष घातले तर तेरणा नदीचा विकास होईल.पुन्हा तेरणा माय पाणीमय होईल.शिवार हिरवाईने नटलेला दिसेल.
खासदार, आमदार,पालकमंत्री लक्ष देतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला वाटत असली तरी ते प्रत्यक्षात कधी सुरुवात होईल यासाठी जनता या कामाकडे डोळे लावून बसलेली आहे.

Post a Comment

0 Comments