Subscribe Us

निवडणूक आयोगाच्या निकालाचे धारशिव येथे जोरदार स्वागत

शिवसैनिकांचा  मोठा जल्लोष! शिवसेना जिंदाबाद चा जयघोष!
. उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री मा.एकनाथभाई शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धाराशिव येथे शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी (दि.17) सायंकाळी पेढे वाटून, फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि गुलालाची उधळण करुन मोठा जल्लोष केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना कुणाची.. एकनाथ भाईंची अशा गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिकांनी निकालाचे जोरदार स्वागत केले. 
       निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा खर्‍या अर्थाने विजय झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आम्ही आहोत हे निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणार्‍या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांना खर्‍या शिवसैनिकांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख सनी पवार, संजय (पप्पु) मुंडे, भीमा जाधव,  सरपंच किरण लगदिवे, कमलाकर दाने, विजय बारकुल, अमर माळी, विशाल हिंगमिरे, विशाल हिंगमिरे, रॉबिन बगाडे, रजनीकांत माळाळे, रणजीत चौधरी, रतन बनसोडे, कुणाल धोत्रीकर, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, अविनाश टापरे, रोहन मोरे, अजिंक्य आगलावे, आतिश माने, आकाश माळी, बबलू नवले, शुभम पांढरे, गणेश जाधव, योगेश तुपे, दिनेश तुपे, संकेत हाजगुडे, कृष्णा घोणे, प्रभात मोरे, सुरज राऊत, पिंटू पवार, विलास लोकरे, दादा घोरपडे, संतोश देवकते, सचिन मडके, लखन झिरमिरे, सिद्धांत सावंत, महादेव राजगुरू,आदित्य थोरात, प्रशांत पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments