Subscribe Us

ग्राहक संरक्षण विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सीमा कुलकर्णी यांची निवड


मुंबई/तेरणेचा छावा:-
      मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मान्यतेने व मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखीताई जाधव यांनी सीमा प्रदिप कुलकर्णी यांची ग्राहक संरक्षण महिला तालुका चारकोण अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र गुरुवार  (दि 1 डिसेंबर )रोजी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी बप्पा सावंत यांच्या उपस्थितीत ग्राहक संरक्षण विभाग मुंबई अध्यक्ष विजय देसाई उपाध्यक्ष स्मिताताई बांदेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
       सीमा कुलकर्णी यांचे मूळ गाव कळंब तालुक्यातील दहिफळ गावा शेजारील अवधूतवाडी येथील असून त्यांनी खेडेगावातून जाऊन मुंबई या ठिकाणी समाजसेवेतून आपले नाव उंचावलेली आहे त्या गेल्या 20 वर्षापासून गोरगरिबांना मोफत व अल्प दरात जेवणाची सोय करत असतात तसेच गरजूंना कपडे ,थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट ,स्वेटर वाटप या प्रकारचे अनेक उपक्रम त्या राबवत असून कोरोना काळाची त्यांनी गोरगरीब  गरजूंना थेट भेटून मोफत जेवण देण्याचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली असून त्यांना संरक्षण विभागाच्या चारकोण महिला तालुकाध्यक्षपदी  निवड करण्यात आली .यावेळी नेहा कुलकर्णी ,संगीता शर्मा ,पुनम पटेल ,मनिषा सुता यांची प्रमुख उपस्थिती होती.
     पक्षाचे ध्येय धोरणे व कार्यक्रम राबविताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊन मुंबईतील धर्मनिरपेक्ष  व्यक्तीचा पक्षात समावेश करून पुरोगामी विचारधारांच्या माध्यमातून संघटन मजबुतीसाठी आपण प्रमाणिक प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो तसेच आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत भरीव कार्य  कराल व पक्ष संघटन मजबुतीने उभी  कराल अशी अपेक्षा व निवडीबद्दल अभिनंदन व शुभेच्छा असे  नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
      त्यांच्या या  निवडीबद्दल कळंब तालुक्यातून व  मुंबई विभागातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments