Subscribe Us

परतापूर -दहिफळ -तडवळा रस्त्यावर खड्डेच खड्डे ,रस्ता नव्हे मृत्युचा सापळा.



 -खड्डा चुकवा बक्षीस मिळावा
दहिफळ/ तेरणेचा छावा;-
कळंब तालुक्यातील दहिफळ गावातून गेलेला परतापूर दहिफळ वाघोली तडवळा रस्ता अक्षरशः खड्डेमय बनला असून या मार्गाने जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
प्रत्येक वर्षी थातुरमातुर खड्डे बुजवले जातात.परंतू कायमस्वरूपी मजबूत रस्ता झालेला नाही.अनेक वेळा या रस्त्यावर खडी टाकली जाते व उचलूनही नेली जाते असा प्रकार ही घडलेला आहे त्यामुळे नेमका रस्ता कधी केला जातो का कागदावरच बनविला जातो अशीही चर्चा नागरिकांतून एकावयास मिळत आहे!
     प्रवास  अंतराचा आहे.मात्र प्रवास करताना  तास वेळ लागतो.खड्डे चुकवताना अनेक प्रवासी पडले आहेतअसून अनेक अपघात घडलेले आहेत याची दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
 सध्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.रस्त्याच्या बाजूला रस्ता दुरुस्तीसाठी खडी येऊन पडली आहे.खडी अर्ध्या रस्त्यावर पडलेली आहे.एक तर रस्ता अरुंद त्यात खडी पडल्यामुळे वाहन चालवणे तारेवरची कसरत आहे.
तडवळा ते परतापूर रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे परंतु कुठेच रस्ता झालेला दिसत नाही.
रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कमी झाली आहे.त्यामुळे गावातील होणारे व्यवहार ही कमी झाले आहेत.
दहिफळ येथे आठवडी बाजार असल्यामुळे.परिसरातील नागरिक येत असतात.रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची ये-जा कमी झालेलीअसल्यामुळे आर्थिक व्यवहारी कमी प्रमाणात होऊ लागले आहेत .तसेच प्रवाश्यांना हाल सोसावे लागत असून वाहनांची मोठ्या प्रमाणावर नुकसान ही होत आहे. तसेच दहिफळ मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांची गैरसोय होत आहे.
रस्त्यामुळे एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
तरी लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातून होत आहे.

Post a Comment

0 Comments