धनेश्वरी शिक्षकरत्न,मराठवाडा ज्ञानरत्न,कार्य गौरव व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
उस्मानाबाद / तेरणेचा छावा:- शिक्षकांनी अध्यापन करताना आभासी जगतातील ज्ञान हे शेवटच्या थरातील विद्यार्थ्यांच्या बुद्धीपर्यंत पोहोचविले पाहिजे तेव्हाच विद्यार्थी हे भविष्यातील जबाबदार नागरिक होतील असे भावपूर्ण प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले.
दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील सांजा रोडवरील आर्यन फंक्शन हॉल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून धनेश्वरी शिक्षण समूहाचे जिल्हाभरातील गुणवंत 21 शिक्षकांना धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व लातूर येथील विभागीय शिक्षण कार्यालयाचे उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे उपस्थित होते.तर उस्मानाबाद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती होती.हा पुरस्कार वितरण सोहळा धनेश्वरी शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पुढे बोलताना माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख पुढे म्हणाले की,विश्वास संपादन करून कर्तबगारीने वागवणूक देण्यासाठी सकारात्मक ध्येय बोली अपेक्षित असून शिक्षकांनी ज्ञान हे संशोधनात्मक द्यावे. भविष्यातील जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी सुज्ञ शिक्षक तसेच पालक यांनी जागरूकतेने ज्ञान दिले पाहिजे. आपल्याला जुन्या पिढीने सुंदर जग दिले म्हणून यापेक्षा अधिक चांगले जगणं निर्माण करून मानवी जीवन समृद्ध बनवले पाहिजे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.गणपतराव मोरे म्हणाले की,सरकारचे गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरण करताना मर्यादा येतात तेंव्हा धनेश्वरी शिक्षण समूहाने समाजातील गुणवंत शिक्षकांना धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार देण्याचे कार्य वाखण्याजोगे आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी नागरिकांनी चौकस बुद्धीचा वापर करून चालू घडामोडीचा आधार घेवून जगण्यातील आनंद घेतला पाहिजे असे म्हणून पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी धनंजय रणदिवे, बाळकृष्ण तांबारे, डॉ. दयानंद जटनूरे यांनी मनोगतातून पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रस्ताविक भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी धनेश्वरी शिक्षण समूहाने राबविलेले सामाजिक कार्य सांगितले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्राचार्य दत्तात्रय घावटे यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनेश्वरी शिक्षण समूहाच्या सर्व प्राचार्य प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आहेत शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक
वरीष्ठ स्तरातून -प्रा.डॉ.दादाराव गुंडरे ( शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब) प्राचार्य जगदीश गवळी (साई संगणक शास्त्र महाविद्यालय रांजणी),कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून डॉ.मीनाक्षी शिंदे (सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब),माध्यमिक स्तरातून भास्कर खडबडे (जिल्हा परिषद प्रशाला पळसप),सोपान पवार (विद्याभवन हायस्कूल,कळंब),सचिन छबिले (छत्रपती विद्यालय वाशी),डॉरत्नाकर पाटील (विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा शिंगोली),महेंद्र बागडे(जिल्हा परिषद प्रशाला जवळा (नि).ता. परंडा),अलीम शेख (बाणगंगा हायस्कूल,भूम)प्राथमिक स्तरातून संजीवन तांबे(जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,आष्टा),सुखदेव भालेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी ता. तुळजापूर), गोविंद घारगे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रवाडी ता.लोहारा),हनमंत पडवळ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव(ज) ता.जि.उस्मानाबाद),अशोक ठोंबळ(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई ता.कळंब),राजेंद्र बिक्कड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी ता. कळंब),संगीता भांडवले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कवडेवाडी ता.वाशी),शबाना शेख(जिल्हा परिषद (उर्दू) प्राथमिक शाळा,येडशी)विशेष शिक्षक म्हणून प्रणिता मिटकर(एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा,यमगरवाडी ता. तुळजापूर) तर विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी गेल्या १८ वर्षापासून काम करणाऱ्या सौ.राजश्री देशमुख(अथर्व युसीमास अबॅकस सेंटर,कळंब)तर पहिल्यांदाच धनेश्वरी मराठवाडा ज्ञानरत्न पुरस्कार आयआयब कोचिंग क्लासेस लातूरचे प्रा.बहादुर थोरात यांना देण्यात आला तर शहाजी चव्हाण यांना धनेश्वरी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला.याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय,येरमाळा या शाळेंचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments