19 सप्टेंबरला कळंब येथे निघणार सकल मराठा मोर्चा
येरमाळा/ तेरणेचा छावा:- कळंब तालुक्यात नुकतीच मराठा समाज मंडळाची स्थापना झाली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टाच्या कायदेशीर तसेच कोरोनाच्या संकटात अडगळीला पडला होता.तो आता ऐरणीवर घेऊन मराठा आरक्षण मोर्चा आंदोलन करुन प्रशासनाला धारेवर धरण्याची मुहूर्त मेढ कळंब तालुक्यातुन रोवली जाणार असून १९ सप्टेंबर रोजी कळंब येथे भव्य मराठा आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन मोर्चासाठी गावोगावी मराठा समाज जणजागृती करुन मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी समन्वय समितीने बैठकांचे नियोजन केले.
शुक्रवार (दि.19 ऑगस्ट) रोजी तालुक्यातील वडगाव (ज.) येथे बैठक झाली.यावेळी गावातील ग्रामस्थ,आबालवृद्ध,युवक,युवती,महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
मराठा आरक्षण मोर्चा समन्वय समितीने कळंब येथील मराठा आरक्षण मोर्चा यशस्वी व्हावा या साठी गावोगावी जाऊन मराठा समाजाचा आरक्षण मुद्दा कोर्टाच्या कायेशीर तर त्या नंतर आलेल्या कोरोनाच्या संकटात अडगळीला पडल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा सरकार विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.आता मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत आंदोलन केले जाणार असून गेल्या वेळी मराठा मूकमोर्चा,ठोकमोर्चा आंदोलन वेळी वडगाव (ज.) गावापासून केलेली मराठा समाज जनजागृती मोहीम यशस्वी झाली होती.त्यामुळे तालुक्यातील गावो गावी जाऊन समन्वय समितीने जनजागृती बैठकीला सुरुवात केली असुन मराठा समाजाने कळंब येथील मराठा आरक्षण एल्गार पुकारला आहे.तालुक्यातील प्रत्येक गावात बैठक घेणार असुन यातुन समजाला आरक्षण कसे गरजेचे आहे.मराठा समाजाची सद्य स्थिती,येणाऱ्या काळातील समाजातील विद्यार्थांना मिळणे आवश्यक का यासह १९ तारखेला कळंब येथर होणाऱ्या मोर्चात समाजातील मुलं,मुली,तरुण,तरुणी,आबालवृद्ध, महिला यांनी सहभागी होऊन यशस्वी करावा यासाठी जनजागृती केली जात आहे.
वडगाव (ज.)येथे मराठा आरक्षण समन्वय समितीने घेतलेल्या बैठकीला मोठी गर्दी होती.या वेळी समन्वय समितीच्या सदस्यांनी जमलेल्या ग्रामस्थांना मराठा आरक्षण व मराठा मोर्चा आंदोलना बाबत मार्गदर्शन केले.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत असून याची सुरुवात कळंब तालुक्यातून होणार आहे.
0 Comments