उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेला पूर्ववत गतवैभव प्राप्त करू - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
राज्यातील नाट्यमय घडामोडीमध्ये कोणाच्या कसल्याही आमिषाला बळी न पडता शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे राहिलेले उस्मानाबद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उस्मानाबद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे अमदार कैलास पाटील यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कौतुक कौतुक करुन समाधान व्यक्त केले.
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन मुंबई येथे जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी मा.उद्धवजी ठाकरेनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिवसेना व ठाकरे यांच नातं कायम आहे त्यावर कुणीही हक्क सांगू नये तसेच पुढील काळात सर्व शिवसैनिकानी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.
आमदार कैलास पाटील हे जीव धोक्यात घालून परत आले. त्याबाबत त्यांनी कसलीही पर्वा केली नाही याबद्दल बैठकीत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विशेष जाहीर कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेला पूर्ववत गतवैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सर्व शिवसैनिक यांच्या साक्षीने पक्ष प्रमुखांना दिला
यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री जेष्ठ नेते दिवाकर रावते, सचिव व खासदार अनिल देसाई,जेष्ठ नेते विश्वनाथ नेरुळकर, उपनेते सचिन अहिर ,शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे , शंकरराव बोरकर , जेष्ठ नेते बाबा पाटील , मा.नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर,माजी जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे,महिला जिल्हाध्यक्ष शामल ताई वडणे ,उप जिल्हा प्रमुख विजय बापू सस्ते, उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीश सोमाणी, कळंब तालुका प्रमुख शिवाजी अप्पा कापसे, कमलाकर काका चव्हाण, मेजर जाधव, संजय खडके, युवानेते किरण गायकवाड,मोहन पनुरे,बालाजी जाधवर ,सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, बसवराज वरनाळे, उमरगा तालुका प्रमुख शहापूरे मामा,तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ दाजी गवळी,छत्रभुज टेळे,तुळजापूर शहर अध्यक्ष सुधीर कदम, उस्मानाबाद,युवा सेनेचे चेतन बोराडे, नितीन बप्पा शेरखाने,अक्षय ढोबळे,सागर बाराते, मनोहर धोंगडे, बालाजी लाखे, सचिन काळे, वैभव वीर,अमोल बिराजदार, अजिंक्य बापू पाटील,ओंकार आगळे, गोविंद चौधरी, मुकेश पाटील, सौदागर जगताप,पिंटू भैय्या कोकाटे, अभिजित देशमुख,दीपक पाटील, धनंजय इंगळे, व्यंकट गुंड, पंकज पाटील, चेतन बंडगर, रोहित चव्हाण, विलास बप्पा थोरबोले, प्रदिप बप्पा मेटे, प्रदीप भाऊ मगर,पांडुरंग माने, अमोल पटवारी,,जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments