Subscribe Us

राजकीय कट्टा' या सोशल मिडिया वृत्तवाहिनीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन.


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:- 
 राजकीय कट्टा' या सोशल मिडिया वृत्तवाहिनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन धनेश्वरी समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. 
     यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, भूम-परंडा-वाशीचे युवक काँग्रेस अध्यक्ष दत्तात्रय तांबे,भूम तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड.सिराज मोगल,माजी जि.प.सदस्य पाटील, पिंपळगावचे सरपंच पती सय्यद सर उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख,योगेश सोन्ने-पाटील प्राचार्य अमर कवडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे भूम सोशल मीडिया अध्यक्ष प्रदीप ढगे पाटील अक्षय खवले,विकीन तांबे,निलेश आडमुठे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
      राजकीय कट्टाच्या कार्यालयास वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, शिवसेनेचे युवासेनेचे संपर्कप्रमुख नितीन लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मनिषा राखुंडे, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग गोरे,उद्योगपती संतोष ठोंबरे, दैनिक लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे-पाटील,
सय्यद सर,जेवे सर,दैनिक लोकमत जाहिरात व्यवस्थापक विकास सूर्डी व रियाज शेख, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, दैनिक सकाळचे दिलीपराव गंभीरे, एमडी लाईव्हचे संपादक रमेश अंबिरकर, तेरणेचा छावाचे संपादक पांडुरंग मते, दैनिक उज्वलकाळचे संपादक अरुण गंगावणे तात्या,उद्योजक सोमनाथ साबळे, प्राध्यापक हरी घाडगे रामचंद्र सुतार,अभिरुद्ध सुतार, विजय काळे,सुरज आदमिले यांच्यासह अनेकांनी भेटी व शुभेच्छा भेटून दिल्या.
   
 यावेळी राजकीय कट्टाबद्दल सर्व मान्यवर नेत्यांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     उद्घघाटनानंतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उद्योग  क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. या सर्वांचे स्वागत राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने,समाधान मातने व अथर्व मातने यांनी केले.

Post a Comment

0 Comments