.
......
वाढदिवस विशेष लेख...
मीच इथे ओसाडा वरती नांगर धरुनी दुबळ्या हाती कणकण ही जागवली माती दुर्भीक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव
माणूस माझे नाव
माणूस माझे नाव......
.शब्द शारदेचे पूजक असणारे अशोक मोहेकर दादा मोहेकर संस्थाचालक, कुशल प्रशासक, मार्गदर्शक आहेत. ज्ञानाच्या अमृत कणांचे सोने करणारे प्रकल्प, समूह संस्था, त्यांनी उभ्या केल्या आहेत. त्यांना साथसोबत . हनुमंत (तात्या) मडके यांनी दिली आहे.
कळंब तालुक्यातील मोहा या गावी फार मोठे कार्य उभे केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर स्वस्थ न बसता अथक परिश्रमातून साखर उद्योग, गुळ उद्योग, बँकेचे कार्य उभे केले आहे. गावाच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. लक्ष दिपांची आरास कोणाला आवडत नाही, पण दिव्यासाठी जळताना स्वतःला किती कष्टातून जावे लागते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे " अशोक दादा" होय. आधी केले मग सांगितले या न्यायाने त्यांनी काही सोबती घेऊन कारखाना उभा केला. ग्रामीण भागातील गरजू- बेरोजगार मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून दिला. समाजाच्या ध्यासाची नवसंजीवनी "दादांच्या" कामात आढळते त्यांच्या या कामाला तात्या सहकार्य करतात. या संस्था समूहाची नाळ दादांच्या विचाराशी जोडली गेलेली आहे. एक "ग्रेट थिंकर" एक शिक्षणवेत्ता अशी त्यांची समाजाभिमुख ओळख आहे. आपल्या विचारांचे पाईक असणारे "दादा" सर्वधर्म समूहाचे पालनकर्ते आहेत. त्यांचा शाळा समुदाय असो की, महाविद्यालय, बँक, कारखाना, यात दादांना आदराने पाहणारे विद्यार्थी, कर्मचारी आहेत. सद्य:परिस्थितीत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी दिमाखदारपणे उभ्या आहेत. मोहा गावचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला आहे असे दिसते. .
कारखाना सहकार तत्वावर चालला पाहिजे हा त्यांचा अट्टाहास आहे. तात्यांनी बँकांना नवसंजीवनी दिली. उसाचे क्षेत्र जास्तीत जास्त लागवडीखाली आले पाहिजे, यावर ते दक्ष असतात. परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन त्याचे गाळप झाले आहे का ते पाहतात. त्यांचे प्रश्न सोडवतात मोहेकर दादांच्या आदर्श विचारसरणीमुळे मोहा कारखान्याला तेराशे सभासद मिळाले आहेत. शैक्षणिक संकुलात घडलेले विद्यार्थी त्यांच्याच हाताला काम मिळाले पाहिजे या उद्देशाने परिसरात हा कारखाना आदर्श ठरला आहे.
जगात काही माणसे हिमालयाएवढ्या उंचीचे असतात, पण ती कधी आपल्या कामाचा बोभाटा करीत नाहीत. त्यापैकी आहेत चेअरमन हनुमंत तात्या मडके व दुसरे डॉक्टर अशोक (दादा) मोहेकर , . महात्मा गांधींच्या "खेड्याकडे चला" या संदेश याप्रमाणे तात्यांनी व दादांनी मोहा गावच्या पंधरा हजार लोकसंख्येला उदात्त विश्वास दिला आहे. .
आपल्या गावच्या विकासासाठी, भल्यासाठी, कार्याची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली. मोहा गाव "शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या" असिम कष्टाने नावारुपाला आले आहे. मोहा गावचे मोहेकर गुरुजी, "तात्या" "दादा" यांनी शिक्षण, उद्योग, स्टील फार्मा, वेअर हाऊस इ.मुळे जिल्ह्यात सरस ठरले आहे.
तालुक्यातील शेतकरी, मजूर, बेरोजगार अशा सामान्य पातळीवरील माणसाला रोजगार आणि शिक्षणाची ज्ञान संजीवनी या दोन आदर्श व्यक्तींनी निर्माण केली आहे. .प्रत्येक कर्मचारी मोहेकर कुटुंबाचा ऋणी आहे.
मोहेकर व त्यांच्या कुटुंबाचे गावा बरोबर सुंदर नाते तयार झाले आहे. समाजात व्यसनाधीनतेची मोठी समस्या आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी एक नियमावली बनवली आहे. तिचे काटेकोरपणे पालन करावे लागते.
मोहा गावी खरेच आदर्श "तात्या व दादा" सारखी खूप मोठ्या मनाची माणसे राहतात, याचा प्रत्येय आला. जगात पोकळ वल्गना करणारे खूप लोक आहेत, पण कृतीतून रोजगार निर्मितीचे स्वप्न उभे करणारे हे मोहेकर घराणे आदर्श होय. बोलता बोलता पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला तेव्हा "तात्या" मोहा गावाच्या कायापालटावर ठाम दिसले. .
मोहा हे "दादांचे" जन्मगाव आहे. कारखाना उद्योगाची उभारणी करणं सोपी गोष्ट नाही पण ती त्यांनी लीलया पेलली आहे. कळंब पासून जवळच असणा रा हा कारखाना आदर्श कामकाजाचा वस्तुपाठ आहे. मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज, मोहेकर मल्टीस्टेट यांची सुरुवात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुण्यतिथी दिवशी झाली आहे. भावी काळात शेतकी अवजारे तयार करणार आहेत.
मोहा या गावात "मोहेकर फार्मा प्रोडूसर कंपनीची" स्थापना स्थापना केली जाणार आहे. त्यात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवल्या जाणार आहेत. राखे पासून कोळसा निर्मितीही करणार आहेत.
रोजगार उपलब्धता मोहा परिसरासाठी "सोनेरी युगाची" सुरुवात ठरते. दादा व तात्या भविष्यात तीन वेअर हाऊस बांधणार आहेत. त्याचा आराखडा तयार आहे मोहा गाव मोहेकर दादां ची जन्मभूमी, कर्मभूमी, ऋणी ठरत आहे. या गावातील लोक साक्षर आहेत. त्याचा फायदा स्टील उद्योगाला मिळणार आहे. दादा पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहेत. उद्योगासाठी वृक्षवल्ली उभा करणारे दोन हजार झाडे तयार केले आहेत. सर्व संचालक मंडळ व मोहेकर कुटुंबीय मोहा गावच्या विकासाला चालना देत आहेत. दादा आपल्या वयाची आपल्या वयाची ६५ वी पूर्ण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. ...
शेवटी माझ्या कवितेत मला लिहावे वाटते.....
"हजारो हजारो घरांची वाट
आकाशात उठून दिसावी
दादा तुमच्या आयुष्याची
पाने लाखो उमटावीत
देवालाही हेवा वाटावा
अशी अजित- अजिंक्य जीवनी गती मिळावी अश्विनी- अस्मिता मोहा गावच्या सुकुमारी जन्मोजन्मी निर्माण व्हावी
तुमच्या शंभर ची वारी
उजळोणी मोहेकर घराणे सारी...
.....................................
दिनांक ११ जुन, २०२२.
"सौ. अलका विजय टोणगे" कळंब,
सहशिक्षिका, विद्याभवन हायस्कूल कळंब.
९४ २० ७७ ०४ ८०.
0 Comments