Subscribe Us

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला .


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा :- 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्यभर संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. शुक्रवार  दि. १७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहात मराठवाडा विभाग मनविसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य सरचिटणीस राजीवजी जावळीकर व राज्य सचिव अक्षयजी काशीद व उस्मानाबाद जिल्हा मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम  जिल्हाध्यक्ष निलेश जाधव कुणाल महाजन  यांच्या प्रमुख उपस्थितीत  उस्मानाबाद जिल्हा  संवाद दौरा निमित्त बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
          यावेळी बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांशी पक्ष वाढीबाबत विचारपूस करण्यात आली.लवकरच पक्षाचे नेते अमितजी ठाकरे हे  उस्मानाबाद जिल्ह्यात येणार असून त्यापुर्वी विद्यार्थी सेनेची नव्याने बांधणी करून संघटना मजबूत केली जाणार आहे.यावेळी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख जिल्हा सचिव आदित्य लग्दिवे तालुका अध्यक्ष विवेक बनसोडे  तालुकाध्यक्ष केतन कदम विद्यार्थी सेनेचे पंकज स्वामी धीरज खोत गोविंद गुंजिटे व मनविसे  पदाआधिकरी  कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments