Subscribe Us

आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे GPAT परीक्षेत उत्तुंग यश.


 उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:- डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी आळणी उस्मानाबाद, येथील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे, राष्ट्रीय स्तरावरील GPAT परीक्षेमध्ये  उत्तुंग यश संपादन केले. 
        GPAT ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे संपूर्ण भारतात घेतली जाते. अतिशय अल्प कालावधीमध्ये आर.पी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने आपल्या यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु.अभिजीत शितोळे, कु.प्रिया कांबळे कु.  विश्रांती फस्के, कु.स्नेहल ओव्हाळ कु. दिशा वडावे कु. अंकुश वानोळे यांनी यश संपादन केले.  
      या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांना GPAT विषयी मार्गदर्शन केले. GPAT सेलचे समन्वयक म्हणून डॉ. गणेश मते यांनी काम पाहिले. या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments