उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आजही मोठी ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीचे मतदान पाहता उस्मानाबाद नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवावी असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बैठकीत दिसून आला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.5) सायंकाळी उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत पक्षबांधणीसाठी सभासद नोंदणीसह आगामी निवडणूकीसंदर्भात कार्यकर्त्याची मते जाणून घेण्यात आली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.बिराजदार म्हणाले, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाची ताकदही मोठी आहे. आगामी नगर परिषदेत सर्व 41 नगरसेवक निवडून आणण्यासाठी, प्रत्येक वार्डात सभासद नोंदणी, बूथ कमिटी सदस्य नोंदणीची तयारी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पार्टीला आणि आरएसएसला ओबीसी आरक्षण नको आहे. ओबीसींचे आरक्षण घालविण्याचे पाप भाजपाचेच आहे. ही बाब प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहचवायला हवी. स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकहीत उतरायला हवे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून उस्मानाबाद नगर परिषदेला भरघोस निधी मिळवून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याची संधी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व जागा मिळवून बहुमताने सत्ता स्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा असे आवाहनही यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.
*विशाल साखरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश*
बैठकीत माजी नगरसेवक अॅड.विशाल साखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी त्यांचे स्वागत करुन पक्षात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल, असे सांगितले.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, युवती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.सुरेखा जाधव, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, शहराध्यक्ष आयाज शेख, सचिन तावडे, सतीश घोडेराव, मनोज मुदगल, असद पठाण, विशाल शिंगाडे, राजकुमार पवार, अभिजित व्हटकर, बिलाल तांबोळी, रणवीर इंगळे, शेखर घोडके, अनिकेत पाटील, सागर शेंडगे, विवेक साळवे, अजयकुमार कोळी, रॉबिन बगाडे, क्रांतिसिंह काकडे, सागर शेंडगे, इक्बाल शेख, निहाल शेख, सरफराज कुरेशी, अतुल आदमाने, सागर चव्हाण, अजीज काझी, शाहरुख शेख, मंजूर शेख, जाकिर शेख, खुद्दुस मोमीन, एजाज काझी, महमूद मुजावर, बाबा मुजावर, प्रदीप घोणे, पृथ्वीराज चिलवंत, कुणाल निंबाळकर, इरशाद शेख, फराह सिद्दीकी, अमृता रंगनाथ दुधाळ, प्रीती गायकवाड, असलम शेख, सचिन सुरवसे, आदिनाथ सरवदे, योगेश सोन्ने पाटील, पंकज भोसले, सौरभ देशमुख, यासीर सय्यद, नवनाथ राऊत, संदीप दुधाळ, जमशेद शेख, इस्माईल शेख, वैभव मोरे, इस्माईल काझी आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments