मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये एरंडवाडी ते पापनास (चोराखळी) हा रस्ता समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्री गडाख यांची शुक्रवारी (दि.6) भेट घेवून निवेदनाद्वारे मागणी केली.
या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हटले आहे की, पापनास (चोराखळी) हे गाव राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे आजोळ असून सदर गाव तीर्थक्षेत्र क मध्ये आहे. या परिसरात प्राचीन काळातील सर्वात मोठे पापनास मंदिर आहे. सदर मंदिराच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविक येतात. परंतु मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. एरंडवाडी हे गाव टेंभुर्णी-बार्शी-लातूर (राष्ट्रीय महामार्ग 465) रोडवर असून पापणास (चोराखळी) गावाकडे जाण्यासाठी शेलगाव (जहागीर) या गावातून जावे लागते. सदर रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा व धाराशिव साखर कारखान्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये एरंडवाडी ते पापनास हा रस्ता सामाविष्ट करुन भाविकांची शेतकर्यांची व येथील जनतेची होणारी प्रचंड गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.
0 Comments