Subscribe Us

आशिष झाडके यांचे भोगजी येथील कलायोग संस्कार शिबिरात नृत्य,नाट्य,योग विषयी मार्गदर्शन.



कळंब/ तेरणेचा छावा:-
    भोगजी तालुका कळंब येथ दिनांक 19 मे ते 31 मे 2022 या कालावधीत  विद्यार्थ्यांसाठी कला योग संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात योग,नृत्य व अभिनय दिग्दर्शक आशिष झाडके व सो शिवानी आशिष झाडके यांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यांनी नृत्य,नाट्य, अभिनय, योग प्रकाराविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या ॲकॅडमी तील विद्यार्थी मानसी वाघमारे, आर्या हारकर, चेतना काळे यांनी नृत्याचे सादरीकरण केलं व त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून देखील एका गीतावर नृत्य प्रात्यक्षिक करून घेतले.
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रकला,शिल्पकला,  हस्तकला,सुंदर हस्ताक्षर, योग अभ्यास, एकाग्रता, व्यक्तिमत्व विकास, गणिती क्रिया, विज्ञान, इंग्रजी संभाषण, विविध खेळ, पोवाडा गीत आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी मिळतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत नाहीत म्हणून या विद्यार्थ्यांना देखील त्याचा अनुभव यावा म्हणून विश्वशांती बहुद्देशीय संस्था व सुजन सृष्टी सेवा मंडळ भोगजी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भोगजी, बहुला, आढाळा, सेलू, पिंपळगाव को. या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे दादासाहेब खराटे व शरद आडसुळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments