Subscribe Us

उमरा येथे संघटीत व असंघटीत कामगारांना मोफत जेवण कार्यक्रमाचा शुभारंभ .


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
उमरा ता कळंब येथे सोमवार दि २३ मे रोजी संघटीत व असंघटीत कामगारांसाठी मोफत जेवणाचा शुभारंभ शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे नुतन संचालक मा श्री केशव सावंत व उस्मानाबाद  नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा श्री मकरंद भैय्या राजेनिंबाळकर  यांच्या हस्ते करण्यात आले
    आपल्या खेडेगावातील  गोरगरीब कष्टकरी  उपाशी राहू नयेत म्हणून युवा सेनेचे तालुका उपप्रमुख उमेश जाधव यांच्या प्रयत्नातून कामगारांना दररोज हक्काचे मोफत जेवण देण्याच्या  कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला ..       
       यावेळी युवा सेना विभागीय सचिव तथा उस्मानाबाद जिल्हा प्रमुख अक्षय ढोबळे  ,शिवसेना वाशी ता प्रमुख सत्यवान गपाट ,वाशी पंचायत समिती सभापती  बाबा घोलप,युवा सेना उपजिल्हा प्रमुख ,विजय राठोड,बाबा तवले,सरफराज पटेल,शिवाजी बेडके,हनुमंत शिंन्दे,बजिरंग जाधव,अमोल गायकवाड,किरण जाधव महादेव जाधव ,लक्ष्मी तावरे दिपाली जाधव आदीसह ग्रामस्थ व कामगार उपस्थित  होते
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  उमरा येथील युवा सैनिक ,शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments