कळंब तालुक्यात भाजपचे गावागावात बैठकांचे सत्र सुरू
दहिफळ/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील भोसा येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच विलास तौर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय कोरे , भिवाजी ताकपिरे ,राहुल माळी यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
मागील दोन महिन्यापासून भाजपाचे तालुकास्तरीय नेते कळंब तालुक्यात गावोगावी जाऊन जनसंपर्क अभियान राबवित असून गावागावात जाऊन बैठकांचे सत्र सुरू आहे .सध्या भाजपची कळंब तालुक्यातील टीम सक्रिय झालेली दिसून येत आहे.जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्या अगोदरच त्याची एक फेरी पूर्ण झालेली आहे.त्यामुळे सध्या कळंब तालुक्यातील गावागावात भाजपचे बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे
सध्या जिल्हा परिषदेचे वारे वाहत असताना तीन पक्षाची तीन तोंड वेगवेगळीकडे असल्याचे दिसून येत असताना भाजप मात्र आपली प्रचार यंत्रणा नियोजित पणे राबवित असल्याचे दिसून येत आहे.
सध्या आघाडी होणार का युती होणार हा प्रश्न असला तरी कळंब तालुक्यात मात्र भारतीय जनता पार्टीने आपली प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात दिसून येत आहे.
0 Comments