उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद जिल्ह्यातील अक्कुबाई पाडोळी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता शिबिरा निमित्त आलेल शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेलच्या वतीने व्यसन मुक्त ग्राम अभियानाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली यावेळी
प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा.ना.राजेश भैय्या टोपे, सामाजिक न्यायमंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे , राज्यमंत्री मा.संजयजी बनसोडे, माजी मंत्री मा.मधुकररावजी चव्हाण, मा.आ.विक्रमजी काळे,राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेल प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. संदीप तांबारे, धाराशीव शुगरचे मा.अभिजीतजी पाटील, जिल्हा सरचिटनीस नितीनजी बागल, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण महाराष्ट्र उपाध्यक्ष तुषार वाघमारे,मा.सतिषजी एखंडे,सामाजिक न्याय विभाग महीला जिल्हाध्यक्ष सौ.सुनंदा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तीके मध्ये भविष्यातील व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे,महिलांचे मेळावे आयोजित करून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत कार्यालये यांच्या मदतीने दारुबंदी सारखे उपक्रम राबवणे , व्यसनाधीनांना व्यसनमुक्तीचे शास्त्रोक्त उपचार उपलब्ध करून देणे , व्यसनमुक्त झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करणे, तसेच गावात विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त व्यसनमुक्ती चे व्याख्यान आयोजित करून गावात व्यसनमुक्तीची चळवळ चालू ठेवणे इत्यादी उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
व्यसन मुक्त ग्राम अभियान हे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेलच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून संपूर्ण गावच्या गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती व्यसनमुक्ती सेलचे राज्यप्रमुख डॉ.संदीप तांबारे यांनी दिली.
0 Comments