Subscribe Us

मंडळ अधिकारी यांच्या पुढाकारातून शिव रस्त्याचा प्रश्न मार्गे.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मलकापूर चोराखळी या दोन गाव दरम्यान असलेला शिव रस्ता हा काही हेवेदावे व वादग्रस्त  कारणामुळे बंद होता लगेच या गावातील अंदाजे 80 ते 100 लोकांच्या वहिवाटीचा येण्याजाण्याचा रस्ता बंद होता  तो चोराखळी येथिल तलाठी श्री.एस.टि.कांबळे, तसेच मलकापुर येथिल तलाठी श्री.एस.पी.तोपरपे, मंडळ अधिकारी श्री‌.डि.एम.कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावातील शेतकरी यांच्या सांमजस्थाने व समोपचाराने गुरुवार दिनांक23 डिसेंबर रोजी वरील महसूल कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत 2 किलो मिटर रस्ता खुला करण्यात आला.यावेळी शेतकरी शिवाजी शिंदे,धनाजी शिंदे,राजेश लोमटे,अशोक लोमटे, खंडेराव डुकरे,शंकर डुकरे,अगतराव घोळवे,समाधान बाराते, रामराजे मिसाळ यादी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments