उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
येरमाळा येथील बाबासाहेब अंबादास तौर यांचा 71 वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संतोष तौर यांचे वडील बाबासाहेब अंबादास तौर यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या सोहळ्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमासाठी चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. अंकुश पाटील, ह-भ-प दत्तात्रय बोधले महाराज, जि प सदस्य मदन बारकुल, ऋतुजा राजे महिला नागरी बँकेचे कार्यकारी संचालक उद्धव गपाट, प्रा. डॉ. सुधीर पाटील उस्मानाबाद नगर परिषदेचे अधिकारी साळुंखे, माजी सरपंच डी आर बारकुल , माजी सरपंच तुकाराम पाटील, मुख्याध्यापक सुनील मुंडे सर, अमोल पाटील राहुल पाटील गणेश देशमुख समाधान बेद्रे, सतीश पाटील लहू बारकुल, संतोष आगलावे , नितीन बारकुल पाटील, पांडुरंग तात्या डुकरे, दीपक बारकुल, सोमनाथ बारकुल, आदीसह जनहित परिवाराचे सर्व सदस्य, वाय.सी.सी. मित्र परिवाराचे सर्व सदस्य नातेवाईक व मित्रपरिवार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून त्यांना उदंड व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनहित परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांचे आभार बाळासाहेब तौर,प्रा.संतोष तौर, सौ.उज्वला संजय रणदिवे या भावंडांनी मानले.
कार्यक्रमासाठी बाहेरगावचे मित्रपरिवार, नातेवाईक ,येरमाळा व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0 Comments