दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे खास दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी वृंदावन फाउंडेशन धाराशिव ,तेरणा काठची पोरं (मराठी वेबसीरीज),साप्ताहिक तेरणेचा छावा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्या-या स्पर्धकांना सन्मान पत्र रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक-११११, द्वीतीय क्रमांक ७७७,, तृतीय क्रमांक-५५५ तसेच सहभागी झाल्या बद्दल सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
आज धावपळीच्या युगात, मोबाईलच्या काळात आपली मुलं कलेपासुन दुर जात आहेत.त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर यावेत, शिवकालीन किल्ले कलात्मक पद्धतीने तयार करता यावेत यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे.यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांना संपर्क करा.
सचिन पाटील-96655 91425
योगराज पांचाळ-7741067973
पांडुरंग मते-94046 77421
0 Comments