Subscribe Us

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना शाखा कळंबचे ठिय्या आंदोलन


 उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य आय.टी. आय. निदेशक संघटना शाखा कळंब यांच्यातर्फे एनपीएस हटाव दिन यानिमित्त दिनांक २९ रोजी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान संस्था गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
      शासनाकडून नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. २००५ नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ती जाचक आहे. ती तात्काळ बंद करून जिपीएफ योजना लागू करावी यासाठी समस्त महाराष्ट्रात सकाळी आयटीआयसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शाखा कळंबचे अध्यक्ष सचिन डोंगरे यांनी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करत सांगितले की शासनाने एनपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, समान काम समान वेतन समान योजना या धोरणाप्रमाणे सर्व कर्मचार्यांना सारखे वेतन मिळालेच पाहिजे. शाखासचिव अनिल आहेर यांनी एनपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच मागील दहा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर कार्य करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्यात आणि तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्याही रास्त मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यावेळी यांनी केली.ठिय्या आंदोलनात कळंब आयटीआय येथील सर्व निदेशक, निदेशिका, तसेच वर्ग चार कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी हजर होते.

Post a Comment

0 Comments