.
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
वृंदावन फाउंडेशन पुणे, साई श्रद्धा फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा "आदर्श शिक्षक पुरस्काराने" प्रा.विशाल जमाले (प्राचार्य शारदा ज्युनिअर कॉलेज,लातूर) यांना सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे ,शेष्याद्रीआण्णा डांगे, प्रा.अमेय महाजन ,हभप लोमटे महाराज यांच्या शुभहस्ते देण्यात आला.याप्रसंगी श्री बाळासाहेब जमाले,श्री नानासाहेब जमाले ,श्री सोमनाथ लांडगे,यांची उपस्थिती होती.
श्री विशाल जमाले सर गेली 12 वर्षांपासून ज्युनिअर कॉलेजवर विज्ञान शाखेमधे अध्यापनाचे कार्य करत आहेत.उक्कडगाव ता.बार्शी येथील सोणवणे कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी 6 वर्षे प्राचार्य पद यशस्वीपणे सांभाळले आहे.यानंतर दयानंद महाविद्यालय लातूर येथे सुद्धा त्यांनी 3 वर्षे रसायनशास्त्र विषयाचे ज्ञानदानाचे कार्य केलेले आहे व सध्या ते शारदा ज्युनिअर कॉलेज लातूर येथे प्राचार्य पदी कार्यरत आहेत.विद्यार्थीप्रीय प्राध्यापक अशी त्यांची ओळख आहे.श्री जमाले यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल , राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके ,धनेश्वरी शिक्षण समुह महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, रत्नागिरी कारागृह अधीक्षक श्री रामराजे चांदणे,ग्लेनमार्क फार्मा दौंड चे क्वालिटी कंट्रोल विभागाचे मॕनेजर श्री राहूल धुमाळ,प्रा.रुपेश अंधारे,प्रा.सतीश मातने,डॉ.संभाजी धुमाळ ,श्री शरद शेळके ,श्री पांडुरंग मते, प्रा.घावटे सर,यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments