दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नवतरूण गणेश मंडळाने ४८ वर्षांपासूनची एक गाव एक गणपती परंपरा कायम ठेवली असुन.कोरोणा पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
१९७३ साली नवतरूण गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे.या गणेश मंडळाच्या माध्यमातून नवतरुण नाट्यमंडळ निर्माण झाले.गावातील शेकडो कलाकार तयार झाले.धार्मिक, सामाजिक विषयांवर नाटके सादर झाली.उस्मानाबाद जिल्ह्यातील ब-याच गावात नाटकाचे प्रयोग झाले.प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.तीन पिढ्या नाटकात काम केले.दिग्दर्शक म्हणून कै.चंद्रसेन थोरात यांनी योगदान दिले.शेकडो कलाकार घडवायचे कार्य थोरात यांनी केले.नाटकाची तालीम सुरू असताना कुणी चुकले तर मार देऊन अभिनय करून घेत असत.आदरयुक्त भिती असल्यामुळे अनेक हडाचे कलाकार घडले.महिला,बाल ,वयोवृद्ध व्यक्तींचा मान ठेवून अपशब्द कधी संवादात येऊ दिला नाही.कलाकारांना शिस्तबद्ध पद्धतीने नाटक सादर करण्याची शिकवण चंद्रसेन थोरात यांनी दिली.आज ही त्यांच्या निधनानंतर एखादी कला सादर करताना त्यांच्या तालमीत तयार झालेले कलाकार अपशब्द येऊ देत नाहीत.गावातील प्रत्येक घरातुन एक तरी कलाकार नाटकात काम केलेला आढळुन येतो.असे हे नवतरुण गणेश मंडळ आपली परंपरा कायम टिकवून आहे.एक गाव एक गणपती कायम ठेवत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत आहे.
दररोज रात्री सार्वजनिक आरती होते.शांततेत गणेश उत्सव पार पाडण्यासाठी नवतरुण गणेश मंडळातील आश्रुबा भातलवंडे, प्रशांत भातलवंडे, रंजीत काकडे, सरपंच चरणेश्वर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णा पाटील
फुलचंद काकडे, फुलचंद पाटील, वसंत मते, अनंत भातलवंडे, सह कार्यकर्त परिश्रम घेत आहेत.
0 Comments