तेरणेचा छावा/उस्मानाबाद:-
राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथे विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथील 2 विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.
येरमाळा तालुका कळंब येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या कुमारी अभिलाषा बालाजी रकटे व नम्रता हनुमंत देशमुख यांना राजश्री शाहू ज्युनिअर कॉलेजच्या प्रथम यादीमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यांना माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये 100% गुण प्राप्त झाले आहेत. त्यांच्या यशाच्या मागे विद्यानिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन पाटील व सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे प्रयत्न आहेत, गेल्यावर्षी पूर्ण वर्षभर ऑनलाइन अभ्यासाद्वारे शिक्षणाचा वसा घेऊन संस्था कार्यरत होती. प्रत्यक्ष सरावा द्वारे परीक्षेवर शाळेने भर दिला होता. तसेच सदर दोन्ही विद्यार्थी या शाळेमध्ये इयत्ता पहिली पासून शिकत होते . संस्थेतील एकूण 22 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त झाले आहेत यामध्ये शाळेतील शिक्षकांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत यामुळेच हे सुयश प्राप्त झाले आहे. आजपर्यंत संस्थेतील अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप, नवोदय,इतर अनेक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेेेेेले आहेत. संस्थेच्या यशाचा आलेख वरचेवर वाढताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातून सर्व विद्यार्थी व शाळेचे कौतुक होत आहे.
0 Comments