दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामरक्षक दलाची स्थापना गेल्या महिन्यात झाली होती.गावात मोठी चोरी झाली.ग्रामपंचायात कार्यालयाच्या वतीने गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना केली आहे.जवळ पास ५० युवक रात्री जागुन कडक पहारा देत आहेत.येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत ३६ गावांचा समावेश आहे.यातील दहिफळ गावातील ग्रामरक्षक दल अतिशय उत्तम रित्या योग्य नियोजन करून गावात गस्त घालत आहेत.त्याच्या सोबत एक पोलिस कर्मचारी उपस्थित असतात.प्रत्येक भागात ग्रुप करुन रात्रभर पहारा देणाऱ्या युवकांचा सत्कार येरमाळा पोलीस स्टेशन येथे करण्यात आला.
प्रत्येक गावात असे योग्य नियोजन करून ग्रामरक्षक दल स्थापन करा.येणा-या गौरी गणेशोत्सव काळात चोरी रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करा.गौरी उत्सव साजरा करताना सोन्या चांदीचे दागिने वापरू नयेत.तसेच दरवाजा बंद करून झोपा.तसेच गल्ली, वस्तीत गस्त सुरू ठेवा.यामुळे चोरट्यांना संधी मिळणार नाही.गाव गल्ली सुरक्षीत राहील.येरमाळा पोलीस ठाण्यात कर्मचारी कमी आहेत.प्रत्येक गावात कर्मचारी देणे शक्य नाही.ग्रामरक्षक दलातील तरूणांनी सहकार्य केले तर पोलिस प्रशासनाला मदत होईल.अतिप्रसंग घटना घडली तर तात्काळ मदत केली जाईल.असे मुंडे म्हणाले.
यावेळी दहिफळ येथील मराठी वेबसीरीज तेरणा काठची पोरं यांनी गावचे रक्षक म्हणून विशेष भाग प्रसारित केला.वेबरसिरीजच्या कलाकारांना बोलावून ए पी आय गणेश मुंडे यांनी सत्कार केला.यावेळी ३६ गावातील पोलीस पाटील,ग्रामरक्षक दलातील युवक उपस्थित होते.
0 Comments