तेरणेचा छावा/बार्शी:
आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव येथे भव्य व्यसनमुक्ती रक्षाबंधन कार्यक्रम. रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी पार पडला.
आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगाव येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना आपल्या बहिणीची कमतरता भासू नये यासाठी केंद्रातील सर्व महिला काउंसलर व इतर कर्मचारी यांनी व्यसनमुक्ती रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याती श्रुती जाधव यांनी केले. तसेच केंद्राचे सायकॉलॉजिस्ट श्री सुहास शिंदे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगत एक चांगला विचार येणाऱ्या दिवसासाठी अनेक चांगले विचार घेऊन येत असतो असे मार्गदर्शन केले. यावेळी आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा निर्धार केंद्रातील रुग्णांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवती घाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्राचे संचालक माननीय डॉ. संदीप तांबारे राज्यप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेल महाराष्ट्र राज्य यांनी केले.
0 Comments