उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-:-
येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यसनमुक्ती सेल राज्यप्रमुख पदी निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे बुधवार दिनांक 28 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले..
गेल्या 15 वर्षापासून व्यसनमुक्ती व वैद्यकीय क्षेत्रात काम करून १० हजाराच्या वर व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम डॉ. तांबारे यांनी केल्यामुळे ग्राम पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साप्ताहिकात व मासिकात त्यांचे लेख व शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत. राज्यात व्यसनमुक्तीची चळवळ वाढावी म्हणून राज्य व्यसनमुक्ती परिषदेची स्थापना करून त्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क वाढवलेला आहे. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात भाग घेऊन व्यसनमुक्तीची जनजागृतीची चळवळ वाढवण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यसनमुक्ती सेलचे राज्यप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या संकल्पनेनुसार राज्यामध्ये व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी व व्यसनमुक्ती चळवळीला डॉ.तांबारे बळ देतील, व्यसनापासून मुक्त झालेल्या रुग्णांचे योग्य पुनर्वसन करतील. असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये व्यसनमुक्ती सेल असावा यासाठी प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी "व्यसनमुक्ती कार्याला योग्य न्याय देणारे व्यक्तिमत्व डॉ. संदीप तांबारे यांची निवड झाल्यामुळे समाधान व्यक्त करुन, क्षेत्रातील अनुभव, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी,अमोघ वक्तृत्व व संघटन कौशल्य पाहता डॉ.तांबरे हे या जबाबदारीला निश्चित न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आ. राहुल मोटे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे ,रवी शेळके, रणजीत शिंदे उपस्थित होते.
डॉ संदीप तांबारे यांच्या निवडीबद्दल व्यसनमुक्ती क्षेत्रातील महाराष्ट्रातील पदाधिकारी ,कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
डॉ संदीप तांबारे यांचे मनोगत....
समाजामध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता कमी होण्यासाठी सामाजिक चळवळी सोबत राजकीय पाठबळ अत्यंत गरजे आहे, मा.ना.जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थापन झालेल्या व्यसनमुक्ती सेलमुळे चळवळ अधिक गतिमान होईल यात शंका नाही. त्यामुळे मला माझ्या आवडीच्या व्यसनमुक्ती क्षेत्राचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यप्रमुख पद दिल्याने माझ्यावरील जबाबदारी वाढली असून मी या पदाला योग्य न्याय देण्याचे काम करणार असून मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments