Subscribe Us

उस्मानाबाद येथे आर पी कॉलेज ऑफ फार्मसी गडपाटी नवीन डी फार्मसी कोर्स ची सुरुवात.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील श्री साई जन विकास प्रतिष्ठान संचलित आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे नवीन डी फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ने शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून माननीय डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार आर पी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे नवीन डी फार्मसी कोर्स सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने तो ग्राह्य धरून आर. पी. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021- 22 पासून प्रवेश क्षमता 60 सह नवीन डी फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता दिलेली आहे, सदरील मान्यतेसाठी संस्थेचे विश्वस्त डॉ. वेदप्रकाशजी पाटील व डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या अभ्यासक्रमास  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन औषध निर्माण शास्त्र या विद्या शाखेत आपले करिअर घडवावे असे आवाहन आर. पी. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments